शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:27 AM2019-04-23T01:27:44+5:302019-04-23T01:28:47+5:30

नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे,

 Sharad Pawar lost his conscience! : Devendra Fadnavis | शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

Next

नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आमच्यावर आरोप करणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलमध्ये गेले नव्हते तर भ्रष्टाचारामुळे गेले होते, अशी टोलेबाजीही त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता केली.
फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना मोदी यांच्या हवेमुळे शरद पवार यांच्यासह राष्टÑवादीसारखे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. शरद पवार यांनी तर बॅट, ग्लोज, हेल्मेट घातले; परंतु नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी गुगली टाकली की ते बारावे खेळाडू झाले आहेत, असे सांगितले. काहीजण आमच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, असे राष्टÑवादीचे बहुरूपी जेलमध्ये जाऊन आले आहेत, अशांनी असे आरोप करू नये, असेही ते म्हणाले.
नारपारच्या पाण्याबद्दल काहीजण दिशाभूल करीत आहेत. उलट कॉँग्रेस काळात केलेला करार मोडीत काढून नव्याने करार करण्यात येणार आहे आणि १७ धरणे बांधून हे पाणी आता महाराष्टÑाला वापरता येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

हे तयार आहेत भजी तळायला; पण तुम्ही तयार आहात का पीठ मळायला?
आपल्या खास शैलीत शीघ्र कवी आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. मध्यंतरी बेरोजगारांनी पकोडे तळण्याचा सल्ला देणारा भाजप नेत्यांचा सल्ला गाजला होता. यावर कॉँग्रेसने टीका केली होती. त्यांचा संदर्भ घेत आठवले यांनी खास काव्यातून टीका केली. यावेळी मोदी तसेच गांधी यांची त्यांनी काव्यात्मक तुलना केली. कॉँग्रेस पक्ष आता पाच वर्षांत भाजप सरकारने काय केले विचारतात; परंतु ७० वर्षांत त्यांनी काय केले असा प्रश्न करताना या पक्षांनी जातीयवाद आणि धर्मवादच पेरला, असाही आरोप आठवले यांनी केला.

Web Title:  Sharad Pawar lost his conscience! : Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.