दुचाकीवरून पडल्याने ज्येष्ठ नागरिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 01:01 AM2019-02-11T01:01:24+5:302019-02-11T01:02:21+5:30

मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले.

Senior citizens killed due to two wheelers being killed | दुचाकीवरून पडल्याने ज्येष्ठ नागरिक ठार

दुचाकीवरून पडल्याने ज्येष्ठ नागरिक ठार

Next

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले.
हेल्मेट परिधान न केल्यामुळे डोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरास प्राधान्य द्यावे, असे वारंवार
सांगितले जात आहे, तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटना घडत आहेत.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती केली जात असून, या अभियानादरम्यान, शहरात भरधाव वाहनाच्या धडकेत तिघे तरुण तर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Senior citizens killed due to two wheelers being killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.