Scolding on the group of Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर शिवीगाळ
मालेगाव येथील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संशयितांविरूद्ध कडक कारवाई करावी, या मागणीसाठी समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर केलेली गर्दी.

ठळक मुद्देमालेगाव येथील घटना : दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

मालेगाव : शहरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना शिवीगाळ करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया रियाजअली युसूफअली व अमीन रजा या दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून संशयितांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या सभेचे छायाचित्र एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले होते. या पोस्टवर कॉमेन्ट्स करताना रियाजअली व आमीन रजा यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, हा प्रकार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या समर्थकांना समजल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित संशयित आरोपींविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर समर्थकांचा रोष कमी झाला.


Web Title: Scolding on the group of Whatsapp
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.