राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:27 PM2017-11-25T16:27:11+5:302017-11-25T16:28:13+5:30

नाशिकमध्ये कार्यक्रम : शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन

 School Education Minister Vinod Tawde's announcement to start one hundred international schools in the state | राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

Next
ठळक मुद्देपहिली शाळा नंदुरबार येथे सुरू करण्यात येईलनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते

नाशिक : जागतिक पातळीवर आपल्या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होण्यासाठी राज्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील पद्धतीचे शिक्षण देणा ऱ्या  १०० आंतराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जातील. त्यामधील पहिली शाळा नंदुरबार येथे सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण आणि  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुक्त विद्यापीठात आयोजित शतायुषी संस्था संमेलनात बोलताना केली.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी तावडे यांनी सांगितले, शिक्षण व्यवस्थेत बदल स्वीकारण्यासाठी मोकळेपणा स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील विकास व बदलांसाठी वेगळे मार्ग चोखाळणा ऱ्या शिक्षण संस्थांच्या मागे शासन भक्कमपणे उभे राहील. राज्यातील जुन्या व जास्त शाळा असण ऱ्या संस्थांना माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यासाठी स्वायत्तता देण्याचा विचार असून, मुंबईसारख्या महानगरातील नामांकित शाळांतील विद्यार्थी व दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना एकाच पातळीवरील परीक्षा देण्याची यामुळे गरज राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शाळांमधील बिगर शिक्षक कर्मचा ऱ्याची पदभरतीसाठी विद्यार्थी संख्या हा निकष ठरविण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संस्थांना मर्यादित स्वरूपात अधिकार असतील. शासनाने राज्यस्तरावर निवड केलेल्या यादीतील शिक्षकांना मुलाखतीद्वारे ते नियुक्ती देऊ शकतील. यावेळी शिक्षकांना देण्यात येणारी शाळा बाह्य कामे दिली जाऊ नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांच्या निमित्ताने प्रभात फे ऱ्याच्या माध्यमातून रस्त्यांवर उपक्र मांसाठी सहभागी करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे तावडे यांनी सांगितले. याप्रसंगी महेश दाबक यांनी प्रास्ताविक केले. तसेच डॉ. काकतकर, श्रीमती करंदीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा, पालकांच्या अपेक्षा आदींबाबत विचार व्यक्त केले. यावेळी तावडे यांनी उपस्थितांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक, शिक्षणतज्ज्ञ सुमनताई करंदीकर आदी उपस्थित होते.

Web Title:  School Education Minister Vinod Tawde's announcement to start one hundred international schools in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.