'School' in Bangalore | बालनाट्यात ‘शाळे’ची बाजी
बालनाट्य स्पर्धेतील विजेता संघ़

ठळक मुद्देनिकाल जाहीर : ‘मला मोठं व्हायचंय’ द्वितीय

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन व साने गुरुजी कथामालेतर्फे आयोजित रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेत इगतपुरीच्या महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘आम्हाला पण शाळा पाहिजे’ नाटकाने बाजी मारली, तर सौंदर्यनिर्मिती संस्थेचे ‘मला मोठं व्हायचंय’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि.११) ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांच्या हस्ते जल्लोषात स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, परीक्षक प्रशांत हिरे, गीतांजली घोरपडे, जयप्रकाश जातेगावकर, हेमंत देवरे, सुनील बस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुरेखा बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल असा
सांघिक उत्तेजनार्थ : मॉँ (नाट्यसेवा), मोल-अनमोल (प्रबोधिनी विद्यामंदिर), पराधीन आहे जगती (र. ज. चौहान बिटको विद्यालय), वैयक्तिक अभिनय : प्रथम : ओम करलकर, द्वितीय : सृष्टी पंडित, तृतीय : कृष्णा राजपूत,
४उत्तेजनार्थ : तनिष्क वाघमारे,
४अन्य अभिनय पारितोषिके : पायल तळेकर, पूनम निकम, दीक्षा डावखर, वर्षा म्हसते, चिन्मय गरु ड, स्वरदा जोशी, प्रतीक लांडगे, वैष्णवी चव्हाण, सृष्टी पंडित, आस्था कुलकर्णी, जीवितेश पवार, अभिषेक माने, क्रांती सरोदे, मृदुला विलग, आदित्य रसाळ, वैष्णवी दीक्षित, सर्वेश बोके, अनुज आवारे, साक्षी, राहुल, आश्रम मोंडे, निकिता पवार, साहिल शेख, आशीर्वाद ठाकरे, कृष्णा रणमाळे, वैष्णवी मुर्तडक, मधुरा कट्टी, अक्षय कुलकर्णी, प्रचिती अहिरराव, ऋ षिकेश मांडे.


Web Title: 'School' in Bangalore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.