सावरकरनगरवासीयांचा थरकाप : बिबट्या लोकवस्तीत शिरल्याने घबराट; आठ तास शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 06:39 PM2019-02-17T18:39:26+5:302019-02-17T18:47:27+5:30

बिबट्याला बेशुध्द करताना अडथळे निर्माण होत होते. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ अन् गोंगाट सुरू झाल्यामुळे बिबट्या त्या बंगल्यात स्थिर राहत नव्हता. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी भुलीचे औषधाचे इंजेक्शन सोडण्याच्या प्रयत्नात असलेले वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला चढविला.

Savarkaran Nagar residents tremble: Panic scared; Eight hours search mission | सावरकरनगरवासीयांचा थरकाप : बिबट्या लोकवस्तीत शिरल्याने घबराट; आठ तास शोधमोहीम

सावरकरनगरवासीयांचा थरकाप : बिबट्या लोकवस्तीत शिरल्याने घबराट; आठ तास शोधमोहीम

Next
ठळक मुद्देसाडेसात वाजेच्या सुमारास बिबट्याने नागरिकांना दर्शन दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास बिबट्याला बेशूध्द करण्यास यश

नाशिक : शहरात महिनाभरानंतर पुन्हा गंगापूररोडवरील त्याच सावरकरनगरात बिबट्याने रविवारी (दि.१७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना दर्शन दिले. बिबट्याचा या भागात मुक्त संचार असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्ष व वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचले. तीन तास शोधमोहिम राबवूनदेखील बिबट्या नजरेस पडला नाही; मात्र दुपारी एक वाजेच्या सुमारास दडून बसलेल्या बिबट्याने रस्त्यावर येत दर्शन दिल्याने पुन्हा घबराट पसरली. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास बिबट्याला बेशूध्द करण्यास यश आले.
सावरकरनगर परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या परिसरात २५ जानेवारी रोजी सकाळी बिबट्याने प्रवेश करत थरकाप उडविला होता. या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा रविवारी (दि.१७) झाली. साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले. त्यानंंतर वनविभागाला माहिती कळविण्यात आली. रेस्क्यू पथकासह गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहचले. सकाळी नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत परिसरातील सर्व बंगले, अपार्टमेंटची तपासणी करत बिबट्याचा शोध घेतला गेला. चव्हाण यांच्या शाकंभरी बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला. वन अधिकारी-कर्मचा-यांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खात्री क रत बिबट्याचा माग काढण्यास सुरूवात केली; मात्र बिबट्या दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आढळून आला नाही. त्यामुळे अखेर शोधमोहीम थांबविली गेली. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या सुमारास दडून बसलेला बिबट्या रस्त्यावर अचानकपणे बाहेर पडला. एखाद्या मोकाट कुत्र्याप्रमाणे त्याने कॉलनीच्या परिसरात धावत एका बंगल्यात उडी घेतली. बी. बी. पाटील यांच्या बंद असलेल्या ‘कौस्तुभ’ बंगल्यात बिबट्याने आश्रय घेतला. या बंगल्यातूनच वनकर्मचा-यांनी बिबट्याला बेशुध्द करत दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पिंज-यात जेरबंद केले.

वरातीमागून पोलिसांचे घोडे
दुपारी एक वाजेपासून बिबट्याचा थरार पुन्हा सुरू झाला. बिबट्या रस्त्यावर आल्याने परिसरात घबराट पसरली. यावेळी वनविभागाचे पथक रेस्क्यू आॅपरेशन राबवित असताना बघ्यांची अनियंत्रित गर्दी झाल्याने अडथळे निर्माण होत होते. बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविताना बोटावर मोजण्याइतके पोलीस आणि वनकमर्चा-यांची दमछाक झाली. बिबट्याला रेस्क्यू करावे, की गर्दी नियंत्रणात आणावी असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्याची मागणी केली त्यानंतर पावणेतीन वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोलिसांची ‘स्ट्रायकिंग फोर्स’ची तुकडी दाखल झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असताना बिबट्याला बेशुध्द करण्यास यश आले आणि सव्वा तीन वाजता पिंज-यात बिबट्याला टाकून पिंजरा वनकर्मचा-यांनी घटनास्थळवरून वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनमध्ये ठेवला. व्हॅनचालक प्रवीण राठोड यांनी वा-याच्या वेगाने व्हॅन गंगापूर गावाच्या पुढे असलेल्या वनविभागाच्या रोपवाटिकेच्या दिशेने धाडली.

गर्दीच्या गोंगाटाने बिथरला
बिबट्याला बेशुध्द करताना अडथळे निर्माण होत होते. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ अन् गोंगाट सुरू झाल्यामुळे बिबट्या त्या बंगल्यात स्थिर राहत नव्हता. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी भुलीचे औषधाचे इंजेक्शन सोडण्याच्या प्रयत्नात असलेले वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या कपाळाला आणि डोक्याला जखमा झाल्या. बिबट्याने त्यांच्या पाठीवर पाय देऊन झेप घेत पुन्हा बंगल्याच्या दुसºया बाजूस पळाला आणि येथील आळूच्या झाडाआड दडला.

Web Title: Savarkaran Nagar residents tremble: Panic scared; Eight hours search mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.