स्वच्छता पंधरवड्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:34 AM2018-07-21T00:34:09+5:302018-07-21T00:34:25+5:30

भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवड्यास प्रारंभ करण्यात आला.

Sanitation fortnight start | स्वच्छता पंधरवड्यास प्रारंभ

स्वच्छता पंधरवड्यास प्रारंभ

Next

सिडको : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवड्यास प्रारंभ करण्यात आला.  उत्तमनगर येथे जनशिक्षण संस्था, रोटरी क्लब नाशिक स्मार्ट व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मविप्र संचालक नाना महाले म्हणाले, स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छतेची शपथ, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्लॅस्टिकबंदी आदी विषयांवर प्रबोधनाचे उपक्रम राबवून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.  या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा लता पिल्ले, तुषार चव्हाण, नगरसेवक शशी जाधव, प्रतिभा पवार, दत्ता पाटील, हरी कुलकर्णी, रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे कैलास वराडे, वैशाली पवार, संगीता नाठे, प्रवीण पवार, राजेंद्र पाटील , प्रकाश नाठे, संगीता देठे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रिया पाटील, सूत्रसंचालन प्रताप देशमुख यांनी केले तर आभार तुषार चव्हाण यांनी मानले.

Web Title: Sanitation fortnight start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक