वटार येथे चंदनचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:20 AM2018-06-10T01:20:11+5:302018-06-10T01:20:11+5:30

वटार : गेल्या काही दिवसांपासून वटार व परीसरात चंदन चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शुक्रवारी रात्री येथील प्रगतीशील शेतकरी शेखर खैरनार यांच्या शेतातील चंदनाची चोरी झाली.

Sandalwood in Wattar | वटार येथे चंदनचोरी

वटार येथे चंदनचोरी

Next
ठळक मुद्दे मोठी टोळी असण्याची भीती

वटार : गेल्या काही दिवसांपासून वटार व परीसरात चंदन चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शुक्रवारी रात्री येथील प्रगतीशील शेतकरी शेखर खैरनार यांच्या शेतातील चंदनाची चोरी झाली.
चार पाच दिवसांपूर्वी शेखर खैरनार यांच्याकडे दोन अज्ञात व्यक्ती येऊन चंदनाचे झाड विकत देण्याची मागणी केली होती. पण शेखर खैरनार यांनी द्यायचं नाही अस सांगून त्याना परतून दिल. पण शेवटी चार पाच दिवसात तेच चंदन चोरांनी चोरुन नेले. हा प्रकार त्याच अज्ञात इसमांनी केला असावा असे तर्क लावले जात असुन गावत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दर वर्षी परिसरात चंदनाची चोरी होते पण वनविभाग चंदन चोरांकडे दुर्लक्ष करते वनविभागात कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्ती घालावी अशी मागणी परिसरातील रहिवाशी करत आहेत.

Web Title: Sandalwood in Wattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक