लोखंडेवाडी, जोपुळसाठी पाणी आरक्षणास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:35 PM2019-06-20T18:35:28+5:302019-06-20T18:35:46+5:30

पालकमंत्र्यांकडे बैठक : कादवात पाणी सोडण्याचे आश्वासन

Sanction of water reservation for Lokhandwadi, Jopul | लोखंडेवाडी, जोपुळसाठी पाणी आरक्षणास मंजुरी

लोखंडेवाडी, जोपुळसाठी पाणी आरक्षणास मंजुरी

Next
ठळक मुद्देउचल पाणी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : पालखेड धरणाखाली असलेल्या खडक सुकेने, जोपुळ, लोखंडेवाडी या गावांसाठी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मिळावे, उचल पाणी परवानग्या मिळाव्यात, कादवा नदीला पाणी सोडावे यासाठी लोखंडेवाडी, जोपुळ, खडकसुकेणे येथील सरपंच व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या समवेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेत चर्चा केली. सदर गावांच्या पाणी आरक्षणास मंजूरी देत कादवा नदीत पाणी सोडण्याचे आश्वासन यावेळी महाजन यांनी देत उचल पाणी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
‘लोकमत’ने सदर गावांचा व कादवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सातत्याने मांडत पाण्याचे आरक्षण मिळावे, उचल पाणी परवानग्या मिळाव्यात यासाठी दोन दिवसांपूर्वीच वत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, खडक सुकेणे, जोपुळ, लोखंडेवाडी, चिंचखेड, कुरणोली या पाच गावांसाठी नियोजित कादवा उचलपाणी संस्था स्थापन करण्यासाठी पालकमंत्री महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर, प्रकाश शिंदे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा खडक सुकेणेचे उपसरपंच पांडुरंग गणोरे, लोखंडेवाडी सरपंच संदीपभाऊ उगले, जोपुळ उपसरपंच माधवराव उगले, माजी उपसभापती वसंत थेटे, काका चौधरी, नवनाथ गायकवाड, शाम लोखंडे, सचिन वाटाणे, अनिल कळमकर, बाळासाहेब गायकवाड, दिगंबर फुगट, संजय जाधव, कैलास गणोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध मागण्यांबाबत माजी आमदार रामदास चारोस्कर, प्रकाश शिंदे यांनी पालकमंत्री यांचेशी चर्चा केली.

Web Title: Sanction of water reservation for Lokhandwadi, Jopul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.