‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:27 AM2018-08-18T01:27:49+5:302018-08-18T01:28:49+5:30

समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे ७५ टक्क्यांच्यावर भूसंपादन झाले असताना इगतपुरी तालुक्यातील वाढत्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेले कवडदरा व देवळे येथील नोड इगतपुरीपासून तळोशी शिवारापर्यंत करण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

 'Samrudhi' rebuts the former Chief Minister of the Badhita | ‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

googlenewsNext

घोटी : समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे ७५ टक्क्यांच्यावर भूसंपादन झाले असताना इगतपुरी तालुक्यातील वाढत्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेले कवडदरा व देवळे येथील नोड इगतपुरीपासून तळोशी शिवारापर्यंत करण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याविरोधात विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी समृद्धिबाधित शेतकºयांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले आहे.  नाशिक दौºयावर आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रश्नांना हात घातला. त्यात समृद्धिबाधित संघर्ष समितीचे तथा इंटकचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चव्हाण यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. समृद्धी महामार्गास झालेला विरोध पाहता प्रशासनाने नोडसाठी सावध  भूमिका घेतली होती; मात्र मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पात स्मार्ट सिटी करण्याचा प्रशासनाचा मानस लपून राहिलेला नाही. त्यामुळे येणाºया काळात समृद्धीपेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्याचा मानस गुंजाळ यांनी व्यक्त केला.  याबाबत समृद्धिबाधितांनी विधिमंडळात आवाज उठविण्याची विनंती चव्हाण यांना केली.  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे,  पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन मते, विजय खातळे, सरपंच किसन गिते, अशोक धोंगडे, सुखदेव धोंगडे, रमेश देवगिरे आदी उपस्थित होते.
गत सत्तावीस महिन्यांपासून समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन करीत असताना भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत संपादन प्रक्रि या राबवावी अशी आमची पहिल्यापासून मागणी होती; मात्र प्रशासनाने त्यास केराची टोपली दाखविली आहे. त्यात आमच्या तालुक्यातील ७५ टक्के जमिनी सरकारने संपादन केल्या असताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली परत एकदा जमिनी सरकार घेणार असेल तर त्याविरोधात मोठा लढा उभारण्यात येईल.
- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धिबाधित संघर्ष समिती

Web Title:  'Samrudhi' rebuts the former Chief Minister of the Badhita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.