साकोरा येथे वादळासह अत्यल्प पाऊस घरांचे पत्रे उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 08:07 PM2019-06-12T20:07:55+5:302019-06-12T20:09:01+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात काल मंगळवारी रात्री अचानक जोरदार वारेवादळासह पावसाने सुरूवात केली. मात्र पाऊस कमी झाला परंतु जोरदार वादळामुळे ९ अनेक घरांचे तसेच पोल्ट्रीचे, गोडाउनचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.तसेच सहा मिहन्यांपूर्वी खैरनार वस्तीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे दुरु स्तीचे काम केले असतांना कालच्या वादळात वरंड्या पाडून पत्रे उडाल्याने एल. ई. डी. चे नुकसान झाले आहे.

In the Sakora, there was no rain in the houses with minor rain | साकोरा येथे वादळासह अत्यल्प पाऊस घरांचे पत्रे उडाले

साकोरा येथे वादळासह अत्यल्प पाऊस घरांचे पत्रे उडाले

Next
ठळक मुद्देनांदगाव : साकोरा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने बारा तास वाहतूक ठप्प; पत्रा पडल्याने बैल जखमीसहा मिहन्यांपूर्वी काम झालेल्या शाळेचे पत्रे उडाले.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात काल मंगळवारी रात्री अचानक जोरदार वारेवादळासह पावसाने सुरूवात केली. मात्र पाऊस कमी झाला परंतु जोरदार वादळामुळे ९ अनेक घरांचे तसेच पोल्ट्रीचे, गोडाउनचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.तसेच सहा मिहन्यांपूर्वी खैरनार वस्तीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे दुरु स्तीचे काम केले असतांना कालच्या वादळात वरंड्या पाडून पत्रे उडाल्याने एल. ई. डी. चे नुकसान झाले आहे.
नांदगाव ते साकोरा रस्त्यावर अनेक झाडे आडवे पडल्याने सा.बा.खात्याच्या अधिकार्यांना रात्रभर जेसीबी न मिळाल्याने तब्बल बारा तास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त साकोरेकरांना काल मंगळवार रात्री नऊ वाजेला जोरदार वादळी वार्यासह पावसाने सुरूवात केली.अवघ्या दिड तासात होत्याचे नव्हते केले. शिवमळा शिवारातील प्रितम पाटिल यांच्या गोडाउनचे, सर्जेराव बोरसे यांच्या राहत्या घराचे तसेच गिरीधर सुरसे यांच्या पोल्ट्रीचे पत्रे उडाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बाळू गुरव यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलाच्या अंगावर पत्रा उडून आल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे.
गतवर्षी याच साकोरा रस्त्याविरल उड्डाणपूल ते शिवमळा वस्तीपर्यंत तब्बल वीस झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला खोळंबा होऊ नये म्हणून प्रीतम पाटील यांनी स्वत: जेसीबी द्वारे दोन तासात रस्ता मोकळा केला होता.मात्र संबधित विभागाने त्यांना याबाबत एक रूपयांचे बील अदा न करता त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याने काल या रस्त्यावर पडलेल्या झाडांना बाजूला करण्यासाठी जेसीबी न मिळाल्याने दुसर्?या दिवसांपर्यंत तब्बल बारा तास वाहतूक ठप्प झाल्याने पाण्याचे टँकर, अनेक वाहने खोळंबल्याने वाहतूक ठप्प झाली तर वेहळगांव कडून येणार्या अनेक प्रवाशांना नांदगाव जाण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली.आज बुधवार रोजी सकाळी संबधित विभागाने वीस की. मी. अंतरावर असणार्या जेसीबी द्वारे झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला.
 
Web Title: In the Sakora, there was no rain in the houses with minor rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस