व्हायरल व्हिडिओवरून स्टंटबाजांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:30 PM2019-01-31T17:30:57+5:302019-01-31T17:31:47+5:30

रेल्वे पोलिसांची कारवाई : मनमाडचे दोघे तरुण ताब्यात

The rumors of stunters from viral video | व्हायरल व्हिडिओवरून स्टंटबाजांच्या आवळल्या मुसक्या

व्हायरल व्हिडिओवरून स्टंटबाजांच्या आवळल्या मुसक्या

googlenewsNext
ठळक मुद्देया स्टंटबाजीचा उपद्रव पुलावरून ये-जा करणा-या प्रवाशांना सहन करावा लागला. संबंधित स्टंटबाजांनी सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा प्रकार चांगलाच चर्चेत आला.

मनमाड : रेल्वेसह स्थानकांमध्ये जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरांचे व्हिडिओ अनेकदा मोबाईलवर व्हायरल होतात आणि ते मोठ्या प्रमाणावर पाहिलेही जातात. व्हायरल व्हिडिओचा पोलिस यंत्रणेकडून गांभीर्याने तपास होतोच असे नाही. परंतु, मनमाड पोलिसांनी मात्र, अशाच एका व्हायरल व्हिडिओवरुन संबंधित स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील रेल्वेस्थानकावर नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् त्यावर असंख्य लाईकचा वर्षाव देखील झाला. मात्र हाच व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य करत त्या टवाळखोर तरु णांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी मनमाड रेल्वे स्थाननकावर नव्याने पादचारी पुल उभारण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये यासाठी पुलावर चढण्यासाठी पायºयांऐवजी उतरता रॅम्प तयार करण्यात आला आहे. या रॅम्प चा वापर करून टवाळखोर तरूणांनी या पादचारी पुलाचा वापर स्टंटबाजी करण्यासाठी केला. विशेष म्हणजे स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर देखील व्हायरल केला. या स्टंटबाजीचा उपद्रव पुलावरून ये-जा करणा-या प्रवाशांना सहन करावा लागला. संबंधित स्टंटबाजांनी सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा प्रकार चांगलाच चर्चेत आला. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. स्टंटबाजी करणा-या तरुणांचा पोलिस व आरपीएफकडून कसून शोध घेण्यात आला. अखेर रेल्वे स्थानकाच्या नवीन पादचारी पुलावर स्टंटबाजी करणा-या दोघा तरु णांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.
प्रत्येकी दीड हजाराचा दंड
पोलिसांनी व्हिडिओची गंभीर दखल शोधकार्य आरंभले आणि इम्रान जाकीर शेख व शुभम सूर्यकांत पोंगालू (राहणार मनमाड) अशी या तरुणांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दीड हजार रु पयांचा दंड केला आहे.

Web Title: The rumors of stunters from viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.