प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:02 AM2018-02-22T01:02:51+5:302018-02-22T01:03:19+5:30

वडाळागाव परिसरातील अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढिगाला बुधवारी (दि. २१) सायंकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजात धस्स झाले.

 The rug fire of plastic glass | प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग

प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग

Next

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढिगाला बुधवारी (दि. २१) सायंकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजात धस्स झाले. संध्याकाळी वडाळागावाच्या दिशेने आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर दिसत असल्याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर साठेनगर भागात कचरा व गवताला आग लागली असल्याची खात्री पटली. तातडीने अग्निशामक दलाच्या मुख्यालयाकडून सिडको उपकेंद्राचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचून लागलेली आग विझविल्याने अनर्थ टळला. मोकळ्या भूखंडावर आग लागल्यामुळे वाºयाने रौद्रावतार धारण करण्याची शक्यता होती. जवळच साठेनगर ही गोरगरीब क ष्टकºयांची वसाहत असल्यामुळे धोका वाढला होता; मात्र तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला व रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आग कोणी लावली याबाबत माहिती मिळू शकली नाही. उघड्यावर शौचासाठी जाणाºया काही लोकांनी धूम्रपान करताना दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे कचºयाने पेट घेतला असावा अन्यथा भंगार गुदामांमधील कामगारांनी कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा या भागात सुरू होती.

Web Title:  The rug fire of plastic glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा