शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:24 AM2019-04-23T01:24:30+5:302019-04-23T01:30:31+5:30

महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते.

 Role of the Congress on Farmers: Due to the dizziness of Narendra Modi | शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

Next

पिंपळगाव : महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते. कॉँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची असून, शेतकºयांच्या मालाला भाव न देणाºया दलालांना मात्र कॉँग्रेसने कायमच संरक्षण दिले. रालोआ सरकारने शेतकरी व ग्राहक या दोघांचा विचार करून त्यांच्या आड येणाºया दलालांचा गेल्या पाच वर्षांत बीमोड करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी (दि. २२) आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. आपल्या अर्धातासांच्या घाणाघाती भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, आपले सरकार देशातील भ्रष्टाचार, आतंकवाद नष्ट करून विकासाच्या दृष्टीने एकेक पाऊल पुढे टाकत असल्यामुळे काही लोकांना विजेचा झटका बसू लागला असून, देशात दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याने त्यांनी आता मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांत जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा व ताकद आपल्या सरकारने वाढविली असून, कोणत्याही राष्टÑाच्या डोळ्यात डोळा घालून बोलण्याची हिंमत प्रत्येक भारतीयांत निर्माण करण्यास आपण यशस्वी झाल्याचे सांगून मोदी यांनी श्रीलंकेत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा संदर्भ देत, शेजारील राष्टÑांमध्ये दररोज बॉम्बस्फोट होत असताना भारतात मात्र सर्वत्र शांतता आहे. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या काळात देशात दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होत असे व अतिरेक्यांचा बीमोड करण्याऐवजी फक्त जागतिक पातळीवर श्रद्धांजली सभा वाहून पाकिस्तानच्या नावाने रडण्यापलीकडे काहीच केले नाही. आपल्या सरकारने कॉँग्रेसच्या काळातील डरपोक नीतीला बदलून टाकले असून, त्यामुळेच आतंकवाद आता फक्त जम्मू-श्रीनगरच्या विशिष्ट कोपºयापुरता सीमित झाला आहे. अतिरेक्यांनाही आता माहीत झाले आहे की पाताळातून आपले सरकार त्यांचा शोध घेऊन शिक्षा देईल. त्यामुळे त्यांच्या कारवाया थंडावल्याचा दावाही मोदी यांनी केला.
शेतकºयांच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, शेतकºयाला बी-बियाणे देण्यापासून ते त्याच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंतची व्यवस्था आपल्या सरकारने निर्माण केली असून, शेतकºयांच्या
मालाला दीडपट भाव देऊन किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना दरवर्षी अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होताच, या योजनेंतर्गत पाच एकर जमिनीची असलेली अट दूर करण्यात येईल, असे जाहीर केले. कांद्याच्या भावाविषयी बोलताना मोदी यांनी, कांद्याच्या
निर्यातीला येणाºया वाहतूक खर्च कमी करण्यात येईल, असे सांगितले.
येत्या पाच वर्षांत ड्रायपोर्ट, बंदरे विकास, महामार्गाचे विस्तारीकरण, उडान योजनेंतर्गत प्रत्येक गाव हवाई सेवेशी जोडण्यात येणार असून, तीन पैकी प्रत्येक एक लोकसभा मतदारसंघात एक वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही मोदी यांनी केली. सकाळी ११ वाजता मोदी यांच्या सभेचे नियोजन होते. परंतु मोदी तब्बल एक तास उशिराने सभास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर नाशिक जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते येवल्याचा फेटा देऊन मोदी यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी व आमदार राहुल अहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.
नाशिकचा गौरवोल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताच उपस्थितांनी दाद दिली. ते म्हणाले, ‘येथे जमलेल्या सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. नाशिकच्या पुण्यभूमीतयेऊन मी धन्य झालो’. त्यानंतर त्यांनी हिंदीतून सुरुवात केली. ते म्हणाले, नाशिकचे नाव घेतले की, संस्कृतीचे सप्तरंग दिसू लागतात. त्यात पहिला रंग आहे आदिमाया सप्तशृंगी देवीचा, दुसरा सिंहस्थ कुंभमेळ्याचा, तिसरा ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचा, चौथा भगवान श्रीराम व सीतेच्या वास्तव्याचा, पाचवा अंजनीसुत हनुमानाच्या अंजनेरीच्या जन्मभूमीचा, सहावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा व सातवा समतेचा सत्याग्रह करणाºया डॉ. आंबेडकरांचा. या सात रंगांनी नाशिकचे तीर्थक्षेत्र नटलेले असल्याचे मोदी यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
कॉँग्रेस अफवा पसरवते
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम वाहिन्यांच्या पाण्याचा विषय छेडून, नाशिक जिल्ह्यातील काही नद्यांचे पाणी अन्यत्र पळविण्यात येणार असल्याची अफवा कॉँग्रेस पसरवित असल्याचा आरोप केला. परंतु आपले सरकार स्थानिक जनतेच्या मनाविरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही, असे सांगून एचएएलच्या बाबतीतदेखील काँग्रेसने अपप्रचार चालविला आहे. सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून एचएएलला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा वर्षांत एचएएलची ताकद तिप्पटीने वाढलेली दिसेल, असा दावाही मोदी यांनी केला.

Web Title:  Role of the Congress on Farmers: Due to the dizziness of Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.