चाकूचा धाक दाखवून लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:22 AM2019-05-20T00:22:22+5:302019-05-20T00:23:24+5:30

पादचाऱ्याला भररस्त्यात मुंबईनाका येथे तिघा संशयितांनी अडवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी राकेशकुमार शामवल्ली प्रसाद (३५, रा. गोविंदनगर) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Robbery with a knife | चाकूचा धाक दाखवून लूटमार

चाकूचा धाक दाखवून लूटमार

Next

नाशिक : पादचाऱ्याला भररस्त्यात मुंबईनाका येथे तिघा संशयितांनी अडवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी राकेशकुमार शामवल्ली प्रसाद (३५, रा. गोविंदनगर) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राकेशकुमार शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्री नासर्डी पुलाजवळील वडाळारोडवरून घराकडे पायी जात होते. त्यावेळी तिघा संशयितांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच एकाने राकेशकुमार यांच्या खिशातील अकराशे रु पये बळजबरीने काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये हाणामारी, भुरट्या चोºया, सोनसाखळी चोरी, घरफोडी आदी घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Robbery with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.