चाकूचा धाक दाखवून युवकाची लूट : एटीएममधून काढले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:18 PM2018-06-11T21:18:43+5:302018-06-11T21:18:43+5:30

नाशिक : दुचाकीवरील दोघा संशयितांनी पादचारी युवकाचा रस्ता अडवत त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, एटीमकार्ड व त्याचा पिनकोड बळजबरीने घेऊन एटीममधून रोकड काढून ६१ हजार रुपयांची लूट केल्याची घटना रविवारी (दि़१०) मध्यरात्री त्र्यबंकरोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानसमोरील रस्त्यावर घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़

Robbery by knife: Money withdrawn from ATM | चाकूचा धाक दाखवून युवकाची लूट : एटीएममधून काढले पैसे

चाकूचा धाक दाखवून युवकाची लूट : एटीएममधून काढले पैसे

Next
ठळक मुद्देत्र्यंबकरोड : जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील घटनामोबाइलसह ६१ हजारांची लूट

नाशिक : दुचाकीवरील दोघा संशयितांनी पादचारी युवकाचा रस्ता अडवत त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, एटीमकार्ड व त्याचा पिनकोड बळजबरीने घेऊन एटीममधून रोकड काढून ६१ हजार रुपयांची लूट केल्याची घटना रविवारी (दि़१०) मध्यरात्री त्र्यबंकरोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानसमोरील रस्त्यावर घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़

सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबक रोडवरील वेदमंदिराजवळ असलेल्या बकुळा अपार्टमेंटमध्ये सुनील राऊत (२५) राहतो़ मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास तो सीबीएस स्टॅण्डवरून पायी जात होता़ त्र्यंबकरोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानावरून जात असताना होंडा दुचाकीवरून दोन संशयित आले़ त्यांनी विनाकारण राऊत यास अडविले व मारहाण करण्यास सुरुवात केली़

यानंतर चाकूचा धाक दाखवून राऊतकडील सोनी कंपनीचा ११ हजार रुपयांचा मोबाइल व खिशातील पाकीट बळजबरीने काढून घेतले़ या पाकिटातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम कार्ड पाहिल्यानंतर त्यांनी राऊतला धाक दाखवून कार्डचा पिननंबर माहिती करून घेतला़ यानंतर दोघा संशयितांनी द्वारका येथील एटीएम सेंटरमधून एटीएम कार्डद्वारे ५० हजार रुपये काढून घेतले़

अशाप्रकारे राऊतचा मोबाइल, पाकिटातील दोनशे रुपये तसेच एटीएममधून काढलेले ५० हजार असा ६१ हजार २०० रुपयांचा ऐवज या संशयितांनी लुटला़ या घटनेनंतर घाबरलेल्या सुनील राऊत या युवकाने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून संबंधित संशयित दुचाकीस्वारांविरोधात फिर्याद दिली़

Web Title: Robbery by knife: Money withdrawn from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.