निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:13 AM2018-07-21T01:13:49+5:302018-07-21T01:14:05+5:30

नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांसह राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयांनी शेतकºयांप्रति सहकार्याची भूमिका ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी केले.

 Review meeting in Niphadal district presence | निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Next

निफाड : नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांसह राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयांनी शेतकºयांप्रति सहकार्याची भूमिका ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी केले. निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सुलभ पीककर्ज वितरण अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, निफाडचे प्रांत महेश पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक भरत बर्वे, निफाडचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, कृषी अधिकारी बी. पाटील, लेखापरीक्षक संजय लोळगे उपस्थित होते. प्रास्ताविक निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी केली आहे. शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात सुलभ पीककर्ज वितरण अभियान सुरू करण्यात आले आहे. निफाड तालुका या अभियानात अग्रेसर असून, आतापर्यंत तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून जवळपास ९१ कोटी रु पयांचे पीक कर्ज वितरण करून ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतचे खरीप व रब्बी हंगामातील उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निफाड तालुक्यात ४६९८ कर्जापासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यातील ८१२ शेतकºयांचे कर्ज मागणी प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकेकडे जमा केले आहेत.
त्यातील ७२२ शेतकºयांचे पीककर्ज मागणी प्रस्ताव बँकानी मंजूर केले आहेत. या आढावा बैठकीस निफाड तालुक्यातील विविध बँकेचे अधिकारी, महासूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्व कृषी सहाय्यक सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते. सूत्रसंचलन जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी भाऊसाहेब गांगुर्डे यांनी केले, तर आभार तहसीलदार दीपक पाटील यांनी मानले.
निफाड तालुक्यातील कर्जापासून वंचित शेतकºयांना खरीप हंगामातील खरीप पीक मिळण्यासाठी तालुक्यातील सहकार, महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागात काम करणाºया सर्व अधिकाºयांनी आपली इतर कामे करून शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य करायचे आहे. कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची तक्र ार येता कामा नये.
- महेश पाटील, प्रांताधिकारी, निफाड

Web Title:  Review meeting in Niphadal district presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.