महसूल कर्मचारी संघटनेत नाशिकच्या तिघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:55 AM2018-12-13T00:55:19+5:302018-12-13T00:55:58+5:30

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे.

 The revenue employees association consists of three trips of Nashik | महसूल कर्मचारी संघटनेत नाशिकच्या तिघांचा समावेश

महसूल कर्मचारी संघटनेत नाशिकच्या तिघांचा समावेश

Next

नाशिक : राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे.  या अधिवेशनात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महसूल संघटनेने राज्य शासनाच्या सेवेतील नायब तहसीलदार या संवर्गातील सर्व पदे ही पदोन्नतीने भरली जावीत अशी मागणी केली असली तरी, ज्या प्रकारे मंत्रालयीन कर्मचारी तसेच पोलीस शिपाई यांना ठरावीक सेवेनंतर परीक्षा घेऊन पद भरती केली जाते तशीच पद भरती करण्यात यावी. या अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात आली.  त्यात राज्य अध्यक्षपदी हेमंत साळवी, राज्याध्यक्षपदी विलास कुरणे, कार्याध्यक्षपदी नरेंद्र जगताप, सरचिटणीसपदी राहुल शेट्ये, कोषाध्यक्ष नंदकुमार बुटे यांची निवड करण्यात
आली.  या कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्याला प्रथमच राज्यस्तरीय संघटनेत ३ पदे मिळाली असून, त्यात नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप यांची महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी, तर कार्याध्यक्ष योगेश्वर कोतवाल यांची महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये धनश्री कापडणीस यांची राज्य महिला प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Web Title:  The revenue employees association consists of three trips of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.