बीएड परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:40 AM2019-07-22T00:40:23+5:302019-07-22T00:40:40+5:30

शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय १०० टक्के निकाल लागला असून, मोतीवाला महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल लागला आहे.

 Results for BEd test | बीएड परीक्षेचा निकाल जाहीर

बीएड परीक्षेचा निकाल जाहीर

googlenewsNext

नाशिक : शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय १०० टक्के निकाल लागला असून, मोतीवाला महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल लागला आहे.
शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) २०१८-१९ वर्षाचा सर्वसाधारण निकाल जाहीर झाला असून, यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातील अश्विनी सहाणे व सोनाली डेर्ले यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला असून, द्वितीय वर्ष बीएडमध्ये ८३.२५ टक्के गुणांसह माधुरी भंडारे प्रथम क्रमांकाने, तर ८२.५० टक्के गुणांसह शीतल आहेर द्वितीय व ८२.१० टक्के गुणांसह मीनाक्षी भालेराव तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर मोतीवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमातील बीएडचा निकाल ९९ टक्के लागला असून, महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा शंभर टक्के निकाल लागला आहे, तर द्वितीय वर्षाचा ९९ टक्के निकाल लागला आहे. द्वितीय वर्षात मानसी भल्ला हिने ७९.९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, स्टेफी सेबेस्टियन हिने ७८.५० फादर जेन्सन यांनी ७८ टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे, प्रथम वर्षात अंकिता जोशी आणि शिवाणी दुसाने यांनी समान गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

Web Title:  Results for BEd test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.