माणकेश्वर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:25 PM2019-01-18T18:25:42+5:302019-01-18T18:26:00+5:30

येथील शताब्दी महोत्सव साजरे करीत असलेल्या श्री माणकेश्वर वाचनालयात न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

Response to the oratory competition at the Manakeshwar Library | माणकेश्वर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

माणकेश्वर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

Next

न्या.रानडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित विक्र म रंधवे, मधुकर शेलार, दत्ता उगावकर,राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र खालकरÞ,संचालक , डॉ.मेघा जगंम, ,रशीद पठाण , सुहास सुरळीकर , प्रा.अनिल दातार,दिलीप कोथमिरे, विजय डेर्ले , बाळासाहेब खालकरÞ व यशस्वी स्पर्धक

निफाड : येथील शताब्दी महोत्सव साजरे करीत असलेल्या श्री माणकेश्वर वाचनालयात न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी व्यासपीठावर लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत डूंबरे व निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक देवदत्त कापसे , वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार , वाचनालयाचे चिटणीस दत्ता उगावकर,सहचिटणीस राजेंद्र खालकरÞ,संचालक सुजाता तनपुरे,डॉ.मेघा जगंम,तनवीर राजे, राहूल दवते, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - इयता ८वी ते दहावी वी गट - प्रथम - प्रगती सिताराम कडवे, जिजामाता कन्या विद्यालय, लासलगांव, द्वितीय - नेहरीन रशिद पठाण -वैनतेय विद्यालय,निफाड , तृतीय ॠतुजा भारत थोरात- जिजामाता कन्या विद्यालय, लासलगांव आण िउत्तेजनार्थ निकीता भारत कदम- स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगांव-,ता.येवला
इयत्ता ५ वी ते ७ वी गट - प्रथम - संस्कृती सचिन जाधव- वैनतेय विद्यालय,निफाड, द्वितीय - कु. लावण्या निलेश शिंदे- वैनतेय विद्यालय निफाड ,तृतीय कु. देवयानी विद्याधर वाघ- छत्रे न्यू इंग्लिश स्कूल —मनमाड , उत्तेजनार्थ - सृष्टी मुकेश सोनवणे व गोकुळ दिलीप गडाख वैनतेय विद्यालय,निफाड
यशस्वी स्पर्धकांना वंदे मातरम् ग्रुपचे अध्यक्ष विक्र म रंधवे यांचे हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिकाची देणगी प्रमुख अतिथी विक्र म रंधवे यांनी दिली तर संपत डूंबरे यांनी मोठ्या गटातील प्रथम पारितोषिक नगरसेवक देवदत्त कापसे यांनी लहान गटातील प्रथम पारितोषिक तर परीक्षक दिलीप कोथमिरे व विजय डेर्ले यांनी उत्तेजनार्थपारितोषिके दिली

स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा.अनिल दातार,दिलीप कोथमिरे, विजय डेर्ले यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन वाचनालयाचे संचालक सुहास सुरळीकर यांनी केले.

Web Title: Response to the oratory competition at the Manakeshwar Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.