नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:57 PM2018-09-16T16:57:27+5:302018-09-16T16:59:58+5:30

नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा वाढवून मयत सभासदांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी संस्थेने एकमताने हा ठराव केला आहे. 

Resolution of giving full debt waiver to the members of District College Teachers' Co-operative Credit Society | नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठराव

नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्हा टिचर्स सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा सभासदांना 9.50 टक्के लाभांश वाटपाचा निर्णय

नाशिक : जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा वाढवून मयत सभासदांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी संस्थेने एकमताने हा ठराव केला आहे. 
केटीएचम महाविद्यालयात रविवारी (दि. १६) जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिल भंडारे, विष्णु रसाळ आदी उपस्थित होते. या बैठकीत कर्जावरील व्याजदर १० वरून ९ टक्के करण्यासह ठेवीवरही ९ टक्के व्याज देण्याचा ठराव करण्यात आला आहे. दीर्घ मुदत कर्जाची मर्यादा १२ लाखांवरून वाढवून २५ लाख रुपये करण्यात आला आहे. पतसंस्थेला आर्थिक वर्षात २ कोटी १५ लाख ५१ हजार २६ रुपये नफा झाल्याने सभासदांना ९.५०  लाभांष वाटपाचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, सभासदांना व्यवहार सुलभ व्हावे म्हणून मोबाइल अ‍ॅपही सुरू करण्यात आले आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कल्पना अहिरे, यशवंत शिरसाठ, नानासाहेब दाते, प्रा. संजय शिंदे, प्राचार्य डॉ. संपतराव काळे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे सेवानिवृत्त सभासदांसह, पीएचडी व एमफील मिळविणारे सभासद व सभासदांच्या दहावी, बारावीतील गुणवंत पाल्यांचा यावेळी गुणगौरव व सत्कार करण्यात आला. 

Web Title: Resolution of giving full debt waiver to the members of District College Teachers' Co-operative Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.