लष्कराच्या भुसंपादनास विरोध

By admin | Published: August 30, 2015 10:16 PM2015-08-30T22:16:29+5:302015-08-30T22:17:52+5:30

लष्कराच्या भुसंपादनास विरोध

Resistance to Army Bhoopadas | लष्कराच्या भुसंपादनास विरोध

लष्कराच्या भुसंपादनास विरोध

Next


इगतपुरी : तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यातघोटी : इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आल्या आहे.अनेक प्रकल्पग्रस्थांना योग्य भरपाई मिळालेली नाही.त्यातच आता उर्विरत जमिनींपैकी तीन गावांतील २२९ हेक्टर बागायती जमीन लष्कराच्या प्रकल्पासाठी जिल्हाधिकार्यांकडून संपादन करण्यासाठी युध्द पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत.यासाठी प्रखर विरोध करण्यात येईल व प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल पण आमच्या तीन गावांतील जमीन संपादन करू देणार नसल्याची भूमिका इगतपुरी पंचायत समतिीचे उपसभापती पांंडुरंग वारु ंगसे यांच्यासह तीन गावांतील शेतकर्यांनी घेतली आहे.या संपादनाला प्रसंगी न्यायालयात जावून कडाडून विरोध करणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव,बेलगांव तर्हाळे, गंभीरवाडी या तीन गावांतील २२९ हेक्टर बागायती जमीन संपादन करण्यासाठी देवळाली कॅम्पच्या आर्टिलरी सेंटरकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.
देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरसाठी युद्धाचा सराव करण्यासाठी तसेच मैदानी गोळीबार आण ितोफखाना सरावासाठी भू संपादन प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे.पिहल्या टप्प्यात बेलगांव तर्हाळे, धामणगाव, गंभीरवाडी या तीन गावांतील २२९ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.दुसर्या टप्प्यात काही लगतच्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार संपादन करण्यात येणार आहे.लष्करी अधिकार्यांनी याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेला आहे. त्यानुसार संपादनाची प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. ही तिन्ही गावे अधिसूचित क्षेत्रातील असल्याकारणाने भू-संपादन करण्यापूर्वी त्या त्या गावांतील ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे ठराव आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी लष्कराला कळवले आहे. भू संपादनाच्या नविन कायद्यातील कलम ?? नुसार ग्रामसभेत मंजूरी मिळणे आवश्यक आहे.लष्करी अधिकार्यांनी या तीन गावांत तात्काळ ग्रामसभा घ्यावी असे पत्र आज ग्रामपंचायतींना दिले.दरम्यान लष्कराच्या या प्रस्तावित भू संपादनामुळे शेकडो शेतकरी कायमचे भुमीहीन होणार आहेत. या पाशर््वभूमीवर तिन्ही गावांतील शेतकर्यांनी तीव्र विरोध करण्यासाठी मोर्चेबांधनी केली आहे. इगतपुरी पंचायत समतिीचे उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. काहीही झाले तरी या तिन्ही गावांतील एक इंच जमीनही संपादित होवू देणार नसल्याची भूमिका वारु ंगसे यांनी घेतली आहे. बेलगांव तर्हाळेच्या सरपंच ललिता बेंडकोळी, धामणगावचे सरपंच राधाबाई बांबळे, उपसरपंच निवृत्ती जाधव,माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे,रामदास वारु ंगसे, बाळकृष्ण वारु ंगसे,पंढरीनाथ वारु ंगसे, पूंजाभाऊ गाढवे, पांडुरंग गाढवे,नामदेव गाढवे, नंदु गाढवे,हिराबाई तातळे, मिराबाई ढवळेआदिंसह सर्व शेतकरी संतप्त झाले असून या विरोधात लढा देण्याच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)
हजारो हेक्टर जमिनींचे संपादन

इगतपुरी तालुक्यात १९४० पासून लष्कर, धरणे, विज प्रकल्प, रस्ते,रेल्वे,औद्योगिकरण यासाठी हजारो हेक्टर जमिनींचे मोठ्या प्रमाणावर संपादन करण्यात आले आहे.नागपुर-मुंबई महामार्गासाठीही अनेक जमीनी संपादनाच्या वाटेवर आहेत.अनेक शेतकरी या कारणांमुळे कायमचे भूमिहीन झालेले आहेत.काहींना ह्या जमिनींचा अत्यल्प मोबदला मिळालेला असून अधिक मोबदल्यासाठी अनेक पातळ्यांवर कायदेशीर लढाया सुरु आहेत.

Web Title: Resistance to Army Bhoopadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.