उत्तरपत्रिका तपासणी कामातून  मुख्याध्यापकांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:13 AM2018-02-25T00:13:53+5:302018-02-25T00:13:53+5:30

उत्तरपत्रिका तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत देणार असल्याची घोषणा विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी केली आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने विभागीय शिक्षण मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जाधव यांनी केलेल्या घोषणेमुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

Resettlement to the Headmasters from postal examination | उत्तरपत्रिका तपासणी कामातून  मुख्याध्यापकांना सवलत

उत्तरपत्रिका तपासणी कामातून  मुख्याध्यापकांना सवलत

Next

सिन्नर : उत्तरपत्रिका तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत देणार असल्याची घोषणा विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी केली आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने विभागीय शिक्षण मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जाधव यांनी केलेल्या घोषणेमुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यातील बहुतांश मुख्याध्यापक केंद्र संचालक व उपकेंद्र संचालक म्हणून काम करतात. मात्र, शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचा मुख्याध्यापकांवर बोजा लादला जात होता. त्यामुळे मुख्याध्याप-कांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी उत्तरपत्रिका तपासणी कामातून सवलत मिळणार असल्याची घोषणा केल्याने मुख्याध्यापक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांनी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, सचिव आर. आर. मारवाडी, सहसचिव मच्छिंद्र कदम, सहायक सचिव वाय. पी. निकम आदींसोबत बैठक घेऊन मुख्याध्यापकांच्या समस्या मांडल्या. उत्तरपत्रिका तपासणीच्या कामामुळे अतिरिक्त ताण पडत असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. दहावी-बारावी परीक्षेच्या भरारी पथकात ज्येष्ठ व अनुभवी मुख्याध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका तपासणी कामातून वगळण्याची ग्वाही जाधव यांनी दिली. मात्र, मुख्याध्यापकांच्या बदल्यात बदली माणूस देण्याची सूचना करत नव्याने मॉडरेटर तयार होईपर्यंत ही कामे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षकांना करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, बी. वाय. पाटील, शुभलक्ष्मी कुलकर्णी, परवेजा शेख, के. टी. उगलमुगले, बी. डी. गांगुर्डे, एन. आर. देवरे, डी. एस. ह्याळीज, अशोक कदम, एस. ए. पाटील, किशोर पालखेडकर, योगेश पाटील, डी. एस. ठाकरे, के. डी. देवढे, संजय देसले, बी. व्ही. पांडे, एम. व्ही. बच्छाव, एम. एन. खैरनार, इरफान शेख, शरद गिते आदी उपस्थित होते.

Web Title: Resettlement to the Headmasters from postal examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.