वाढत्या गुन्हेगारीबाबत मनसेचे पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:40 PM2019-07-05T23:40:46+5:302019-07-06T00:16:35+5:30

पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवस नागरिकांच्या गाडीतून काचा फोडून रोकड लंपास करणे, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनातून लॅपटॉप तसेच बॅगांमधून मोबाइल चोरने, महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे घरासमोरून लुटून नेणे यांसारख्या घटना घडत असून, वाढत्या गुन्हेगारी व आळा बसण्यासाठी गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 Request for MNS police regarding rising crime | वाढत्या गुन्हेगारीबाबत मनसेचे पोलिसांना निवेदन

वाढत्या गुन्हेगारीबाबत मनसेचे पोलिसांना निवेदन

Next

पंचवटी : पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवस नागरिकांच्या गाडीतून काचा फोडून रोकड लंपास करणे, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनातून लॅपटॉप तसेच बॅगांमधून मोबाइल चोरने, महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे घरासमोरून लुटून नेणे यांसारख्या घटना घडत असून, वाढत्या गुन्हेगारी व आळा बसण्यासाठी गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नाशिक शहर मंदिरांच्या शहराऐवजी गुन्हेगारांचे शहर ओळख बनू पाहत असल्याने कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. राहुल ढिकले, अनंता सूर्यवंशी, अनिल मटाले, सलीम शेख, सागर बैरागी, प्रवीण भाटे, भाऊसाहेब निमसे, विलास जोशी, सुनील वाघ, विक्रम मंडलिक, आढळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

Web Title:  Request for MNS police regarding rising crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.