रेणुकामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथम वर्धापन दिन : दर्शनासाठी सिडको परिसरातील भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:26 AM2018-05-27T01:26:09+5:302018-05-27T01:26:09+5:30

सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

Religious Activities in the Renuka Mata Temple First Anniversary: ​​A crowd of devotees in the Sidkon area for Darshan | रेणुकामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथम वर्धापन दिन : दर्शनासाठी सिडको परिसरातील भाविकांची गर्दी

रेणुकामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथम वर्धापन दिन : दर्शनासाठी सिडको परिसरातील भाविकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देसकळी महाअभिषेक, होमहवन, दुपारी दुर्गा सप्तपदी पाठ सायंकाळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती

सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
शुभमपार्क कला, क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकळी महाअभिषेक, होमहवन, दुपारी दुर्गा सप्तपदी पाठ सायंकाळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यांनतर भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सचिन म्हसाने, सचिन विधाते, हेमंत भालेराव, यशोदीप जोशी,अतुल देव, अभिजित पाटील, कमलेश शिंदे आदींचा सहभाग होता. दर्शनासाठी व महाप्रसादास भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी नगरसेवक छाया देवांग, दिलीप देवांग, प्रकाश गुंजाळ , रवींद्र काकड, सचिन महाजन, लक्ष्मण बागड, राजहंस खानकरी, पंडित अहेर, आदी सहभागी झाले .

Web Title: Religious Activities in the Renuka Mata Temple First Anniversary: ​​A crowd of devotees in the Sidkon area for Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक