हुहहुडीपासून नाशिककरांना दिलासा; घडले सुर्यदर्शन, निवळले ढगाळ वातावरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:01 PM2017-12-06T17:01:18+5:302017-12-06T18:11:53+5:30

शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले.

Relief from cloudy Sudden sunshine, relaxed atmosphere! | हुहहुडीपासून नाशिककरांना दिलासा; घडले सुर्यदर्शन, निवळले ढगाळ वातावरण !

हुहहुडीपासून नाशिककरांना दिलासा; घडले सुर्यदर्शन, निवळले ढगाळ वातावरण !

Next
ठळक मुद्देनाशिकचे किमान तपमान १७.८ अंशावर सुर्यकिरणे पडल्यामुळे शेतक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला.१७.८ अंश इतके किमान तपमान

नाशिक : नाशिकच्या किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले होते; मात्र बुधवारी नागरिकांना हुडहुडीपासून काहीसा दिलासा मिळाला. सकाळी सुर्यदर्शन घडले व ढगाळ हवामान दुपारपर्यंत कमी झाले होते.
‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव मंगळवारी जाणवला. पहाटेपासून शहरात मळभ दाटून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला होता. यामुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी होऊन वाहतूकही रोडावली होती; मात्र बुधवारी सकाळपासून सुर्यकिरणे आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये गर्दी दिसून आली. तसेच बाजारपेठाही गजबजल्याचे चित्र पहावयास मिळाले.


शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. रिमझीम पावसानेही उघडीप घेतल्याने शहराचे बदललेले हवामान सुधारले आहे. सुर्यकिरणे पडल्यामुळे शेतक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण ढगाळ हवामानासह रिमझिम पावसाने कांदा, द्राक्ष बागायतदार संकटात सापडले होते.


दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरक लेल्या ओखी वादळाने गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले होते. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला होता.


 

Web Title: Relief from cloudy Sudden sunshine, relaxed atmosphere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.