संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:31 AM2019-03-15T01:31:45+5:302019-03-15T01:32:37+5:30

आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

Referral to a female doctor of the hospital for five lakh rupees | संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा

संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा

Next

नाशिक : आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिक शहरातील संदर्भ सेवा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला अज्ञात आरोपीने मोबाइलवरून संपर्क साधत बजाज फायनान्सचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत क र्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेला ७७५६८१७२८१ या मोबाइल क्रमांकावरून एका अज्ञाताने मी बजाज फायनान्सचा कर्मचारी असल्याचे सांगत कंपनीने आपली डॉक्टरांसाठी असलेल्या ‘लोन अगेन्स इन्शुरन्स’ या योजनेसाठी निवड केली असून, आपला अपु्रव्हल आयडी ०५०२४ एमएन १८ असा असल्याचे सांगितले. तसेच लोणच्या हप्त्याच्या ७५ टक्के रक्कम सुरुवातीच्या पहिल्या वर्षात भरावे लागणार असल्याचे सांगितले. व्यवसायासाठी लोनची आवश्यकता असल्याने महिला डॉक्टरचाही त्याच्यावर विश्वास बसला. डॉक्टरांनी अज्ञातावर विश्वास ठेवून कॅनडा कॉर्नर येथील ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स येथील त्यांच्या खात्यामधून एनईएफटीद्वारे पैसे अज्ञाताच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर आरोपीने पुन्हा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून महिला डॉक्टरशी संपर्क साधत तसेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश लोन मिळवून देण्याचे सांगत बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र फिर्यादीने पहिल्यांदाच अज्ञात आरोपीच्या खात्यावर पैसे जमा केलेले असल्याने त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अज्ञात आरोपीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आॅनलाइन व मोाबाइलवरून होणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात केवळ अशिक्षित अथवा सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षत नागरिकही अडकत असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.

Web Title: Referral to a female doctor of the hospital for five lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.