बनावट प्रमाणपत्रावर पोलीस शिपाईपदी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:24 AM2018-03-18T01:24:09+5:302018-03-18T01:24:09+5:30

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात गतवर्षी राबविण्यात आलेल्या पोलीस शिपाई बॅण्डमन पदाच्या भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या महिला पोलीस उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता के. व्यंकटगौड व अन्यायग्रस्त महिला उमेदवार शुभांगी आंबेकर यांनी शनिवारी (दि़१७) मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली़

Recruitment of police personnel on fake certificate | बनावट प्रमाणपत्रावर पोलीस शिपाईपदी भरती

बनावट प्रमाणपत्रावर पोलीस शिपाईपदी भरती

Next
ठळक मुद्देतक्रार : बॅण्डमन भरतीतील प्रकार

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात गतवर्षी राबविण्यात आलेल्या पोलीस शिपाई बॅण्डमन पदाच्या भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या महिला पोलीस उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता के. व्यंकटगौड व अन्यायग्रस्त महिला उमेदवार शुभांगी आंबेकर यांनी शनिवारी (दि़१७) मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली़
व्यंकटगौड व आंबेकर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनानुसार २०१७ मध्ये शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली़ या भरतीमध्ये शीतल संपत गायकवाड हिची पोलीस शिपाई बॅण्डमन या पदासाठी निवड करून नियुक्ती देण्यात आली़ मात्र, गायकवाड हिने भरतीसाठी दिलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे बनावट असून, त्यावरील सही व शिक्केही खोटे आहेत़ विशेष म्हणजे निवड झालेल्या गायकवाड हीस नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र दिले नसल्याचे नाशिक तहसील कार्यालयाने माहिती अधिकारात सांगितले आहे़ पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल व पोलीस उपायुक्तमाधुरी कांगणे (प्रशासन) यांच्याकडे पुरावे सादर करूनही त्यांनी दखल घेतली नाही़ त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकांकडेही तक्रार करण्यात आली आहे़ पोलीस शिपाई पदासाठी राबविण्यात आलेल्या भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर केलेल्या शीतल गायकवाड विरोधात आयुक्तांनी कोणतीही कारवाई वा तिची नियुक्ती रद्द केली नाही़ त्यामुळे या भरतीप्रकियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे़अन्यथा आमरण उपोषणपोलीस आयुक्तालयातील भरतीप्रकियेतील प्रमुख अधिकारी तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणाºया गायकवाड हिच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणाºया अधिकाºयावर कारवाई करावी़ तसेच गायकवाड हिची अंतिम निवड रद्द करून प्रतीक्षेतील उमेदवारास नियुक्ती द्यावी अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त शुभांगी आंबेकर हिने दिला आहे़

Web Title: Recruitment of police personnel on fake certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा