पोलिस कारवाईत सव्वा लाख रु पये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:32 PM2019-02-02T17:32:27+5:302019-02-02T17:35:29+5:30

सटाणा : मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही सुरू झाली आहे. सटाणा शहर व तालुक्यात शुक्र वार पासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट घालून येणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून गुलाबपुष्प देवून स्वागत झाले. तर विनाहेल्मेट दुचाकीधारकांसह सिटबेल्टचा वापर न करणाºया चारचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दिवसात सव्वा लाखहून अधिक रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आला. काही वाहने जप्तही करण्यात आली आहेत.

Recovery of fine of Rs | पोलिस कारवाईत सव्वा लाख रु पये दंड वसूल

पोलिस कारवाईत सव्वा लाख रु पये दंड वसूल

Next
ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : सटाणा, जायखेडा भागात विशेष मोहीम

सटाणा : मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही सुरू झाली आहे. सटाणा शहर व तालुक्यात शुक्र वार पासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट घालून येणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून गुलाबपुष्प देवून स्वागत झाले. तर विनाहेल्मेट दुचाकीधारकांसह सिटबेल्टचा वापर न करणाºया चारचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दिवसात सव्वा लाखहून अधिक रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आला. काही वाहने जप्तही करण्यात आली आहेत.
दरम्यान, नाशिक येथील चारचाकी वाहनधारकाने पोलिसांच्या अंगावरच गाडी घेऊन जाण्याचा प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेतले आहे. सटाणा पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी सोनाली कदम, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा यांच्यासह पोलिस कर्मचाºयांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सिटबेल्ट नसलेल्या चारचाकी चालकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड भरण्यासाठी वाहनधारकांनी रांग लावली होती. लग्नसराई आणि आठवडे बाजार असल्यामुळे बहुतांश दुचाकी स्वरांची हेल्मेट नसल्यामुळे पंचाईत झाली.
काही दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला विक्र ीसाठी असलेल्या स्टॉल वरु न हेल्मेट विकत घेत दंडात्मक कारवाई टाळतांना दिसून आले. या मोहिमेत शनिवारी दिवसभरात पाचशेहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे सटाणा पोलिसांनी सांगितले.
चौकट.......
शहर व तालुक्यातील वाहनधारकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. विनाहेल्मेट व विना सिटबेल्ट चालकांवर कारवाई सुरूच राहणार असून, जे वाहनधारक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
शशिकांत शिंदे, पोलिस उपअधीक्षक , सटाणा

(फोटो ०२ सटाणा)
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी सटाणा व जायखेडा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.सटाणा येथे विनाहेलमेट दुचाकीधारकांविरु द्ध दंडात्मक कारवाई करतांना पोलीस अधिकारी देवेंद्र शिंदे आण िपोलीस कर्मचारी.

Web Title: Recovery of fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस