कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:30 PM2018-01-23T23:30:01+5:302018-01-24T00:14:30+5:30

१२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उतारा मिळत १५१७०० क्विंटल साखर निर्मिती झाल्याची माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.

 Record mill of Kadwa factory | कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप

कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप

googlenewsNext

दिंडोरी : १२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उतारा मिळत १५१७०० क्विंटल साखर निर्मिती झाल्याची माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. कादवाच्या विक्र मी गाळपाबाबत आमदार नरहरी झिरवाळ यांनी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळ, कादवाचे प्र. कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, चीफ इंजिनिअर विजय खालकर, चीफ केमिस्ट सतीश भामरे, चीफ अकाउण्टण्ट जगन्नाथ शिंदे, शेतकी अधिकारी मच्ंिछद्र शिरसाठ, कामगार युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींसह सर्व अधिकारी तसेच कामगार यांचे अभिनंदन केले.  यावेळी मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील, माजी सभापती सदाशिव शेळके, संचालक बापू पडोळ, माजी संचालक संजय पडोळ, साहेबराव पाटील, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ. अनिल सातपुते, गंगाधर निखाडे, डॉ. गोसावी, राजेंद्र उफाडे, भाऊसाहेब उगले, भाऊसाहेब पाटील, अंबादास पाटील, प्रकाश पिंगळ आदींसह सर्व संचालक कामगार उपस्थित होते.
कादवाने गाळप क्षमता वाढविण्यासाठी जुनी मशिनरी दुरुस्त करताना, बदलवताना वाढीव क्षमतेची केली असून, टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कोणतेही दीर्घ मुदतीचे कर्ज न घेता टप्प्याटप्प्याने मशिनरी दुरुस्ती नूतनीकरण सुरू आहे. यंदा सुमारे पावणेदोन कोटी खर्च करत वाढीव क्षमतेचे वेपरसेल, पॅन, क्रिसलायजर या मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. या बदलामुळे यंदा २०००च्या दरम्यान ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अखेर हे उद्दिष्ट साध्य होत कादवा सद्या २००० मे.टनच्या दरम्यान प्रतिदिन ऊस गाळप करत असून, सोमवारी (दि. २२) २३३६ विक्रमी मे. टन ऊस गाळप केले आहे. कादवाने ऊसतोडीचे नियोजन करत कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसतोड मजूर उपलब्ध करून देत ऊसतोडीचा कार्यक्रम आखला असून, कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी आटोपताच जिल्ह्यातील शिल्लक ऊस तोडणीचे नियोजन केले जाणार आहे तरी सर्व ऊसतोडणी वेळेत होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी सहकार्य करत गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक, सर्व अधिकारी उपस्थित होते. 
कमी गाळप क्षमता असताना दूरदृष्टी ठेवत अध्यक्ष श्रीराम शेटे व त्यांचे संचालक मंडळ यांनी नियोजन करत गाळप वाढविले. मी त्यांचे व टीम कादवाचे अधिकारी, कामगार यांचे अभिनंदन करतो. कादवाच्या कोणत्याही कामासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत माझे कर्तव्य पार पाडणार असून, साखरेचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे.  - नरहरी झिरवाळ, आमदार 
कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणत, सुरू ठेवत सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही एकाच वेळी गाळपासाठी तयार होणारा ऊस तोड करताना गाळप क्षमतेची मर्यादा आड येत असल्याने ऊस उत्पादकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत होते त्यामुळे आपला प्रथमपासून कमी दिवसात जास्त गाळप कसे होईल, असा प्रयत्न होता. कादवाच्या भरभराटीत त्यांचा मोठा वाटा आहे. सद्या साखरेचे भाव दररोज कोसळत असल्याने कारखाने अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.  - श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा

Web Title:  Record mill of Kadwa factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.