बोंडअळी नुकसानभरपाईचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:06 AM2018-07-18T02:06:12+5:302018-07-18T02:06:29+5:30

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

Receipt of compensation for Bondali district | बोंडअळी नुकसानभरपाईचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त

बोंडअळी नुकसानभरपाईचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे३८ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
कापसाच्या वाणामुळे गेल्यावर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतातील उभे पीक या अळींनी फस्त केल्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला व मोठे नुकसान सोसावे लागले होते. राज्यातच हा प्रकार घडल्याने सरकारने बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सात तालुक्यांतील ५३,३९३ शेतकºयांच्या ३५,९४७ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याने २६ कोटी ३३ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे येवला व मालेगाव या दोन तालुक्यातील ३९८ हजार शेतकºयांच्या खात्यावर येत्या काही दिवसांत भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.
शासनाने १४ मे रोजी सात कोटी दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता पाठविला होता व त्यानंतर १० कोटी ५४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अनुदानातून १५ हजार ३३० शेतकºयांना पैसे वाटप करण्यात आले तर येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांना काही प्रमाणात रक्कम देण्यात आली होती. उर्वरित ८ कोटी ७७ लाख रुपयांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्याने शासनाने सदरचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Web Title: Receipt of compensation for Bondali district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.