युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:48 AM2019-01-13T00:48:50+5:302019-01-13T00:49:54+5:30

जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

 Rape of the young woman | युवतीवर बलात्कार

युवतीवर बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयितास पाच दिवसांची कोठडी

नाशिक : जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संशयित अनिल भारत अवचारे (२८, रा. अरिंगळे मळा, एकलहरारोड) यास न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, जेलरोड येथील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी जाणाºया १७ वर्षीय मुलीसोबत झालेल्या ओळखीचा गैरफायदा अवचारे याने घेतला. पीडित मुलीला २०१६ ते २०१८ या दोन वर्षांमध्ये वेळोवेळी चिठ्ठ्या लिहून पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अल्पवयीन मुलीचा विश्वास जिंकून झालेल्या जवळीकचा गैरफायदा घेत मोबाइलने अवचारे याने पीडितेचे अश्लील अवस्थेत छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे लॅपटॉपवर सेव्ह करून पीडित मुलीला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भीती निर्माण केली.

Web Title:  Rape of the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.