रानमेवा, ‘डोंगरची काळी मैना’च्या विक्रीतून उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:45 PM2019-06-18T23:45:50+5:302019-06-19T01:05:03+5:30

शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे.

Rannmeva, turnover from the 'Mountain of Black Mina' | रानमेवा, ‘डोंगरची काळी मैना’च्या विक्रीतून उलाढाल

रानमेवा, ‘डोंगरची काळी मैना’च्या विक्रीतून उलाढाल

Next

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे.
उदरनिर्वाहासाठी पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना त्यांच्या मनात रुजू लागली. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या सद्यस्थितीतील पिढ्यांना प्रेरित केले. दरम्यान, या सर्व बाबींचा लेखाजोखा बघितला तर आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानमेव्याच्या
विक्र ीतून आर्थिक वृद्धीस हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडी परिसरात आदिवासी बांधव रस्त्याच्या कडेला करवंद, जांभळे, गावठी आंबे विक्रीसाठी घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंगगडाच्या पायथ्याच्या परिसरातही त्यांनी दुकाने थाटली आहेत.
बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत, तर डोंगराळ भागात व दरी-खोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक परिसरातील नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून चार पैसे आदिवासी बांधवांना मिळत आहे.
दरम्यान, वणी-सापुतारा मार्गावर स्ट्रॉबेरीसह जांभळे, करवंद या फळांची विक्री होताना दिसत आहे. खासगी वाहने, आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे खरेदीदार आहेत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला लहान मुले फळांची विक्री करून दोन पैसे कमावताना दिसत आहे.

Web Title: Rannmeva, turnover from the 'Mountain of Black Mina'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.