प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:37 PM2018-02-09T23:37:11+5:302018-02-10T00:30:48+5:30

खर्डे : रामेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,

Rameshwar, the seventh consecutive Hariman week celebrated by Lord Ramchandra's inspiration | प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह

googlenewsNext

खर्डे : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र श्रीक्षेत्र सहस्रलिंग, रामेश्वर (ता. देवळा) येथे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरु वर्य वामनानंद महाराज (खर्डे) यांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुखानंद महाराज यांनी दिली. गेल्या ५६ वर्षांची परंपरा असलेल्या रामेश्वर येथील श्रीक्षेत्र सहस्रलिंग या कोलथी नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रावर कीर्तन व प्रवचन सेवा अशा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सुदाम महाराज, शिवाजी महाराज (जोपुळ), भाऊसाहेब महाराज (खर्डे), जगदीश महाराज (त्र्यंबकेश्वर), विश्वनाथ महाराज (तळवाडे), शिवाजी महाराज (भालूर), श्रीपादजी महाराज भडांगे (सोलापूर) यांच्या जागर व काल्याच्या कीर्तनाने दि. १४ फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे.
पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुखानंद महाराज व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Rameshwar, the seventh consecutive Hariman week celebrated by Lord Ramchandra's inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक