‘रॅम’ : सायकल चळवळीतून पर्यावरण संवर्धनाच्या जागरसाठी नाशिकचे सायकलिस्ट आहेर दाम्पत्य करणार महाराष्ट्र भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:30 PM2017-11-28T21:30:06+5:302017-11-28T21:34:50+5:30

पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत.

'RAM': Nashik's cyclist Aaher to be couple to cycling environment | ‘रॅम’ : सायकल चळवळीतून पर्यावरण संवर्धनाच्या जागरसाठी नाशिकचे सायकलिस्ट आहेर दाम्पत्य करणार महाराष्ट्र भ्रमण

‘रॅम’ : सायकल चळवळीतून पर्यावरण संवर्धनाच्या जागरसाठी नाशिकचे सायकलिस्ट आहेर दाम्पत्य करणार महाराष्ट्र भ्रमण

Next
ठळक मुद्देहे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. २३ दिवसांच्या या सायकल भ्रमण यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर

नाशिक : सायकल चळवळीचे माहेरघर म्हणून नवी ओळख प्राप्त करणाºया नाशिकमधील एक सायकलिस्ट दाम्पत्य २३ दिवसांची ‘रॅम’ अर्थात राईड अ‍ॅक्रॉस महाराष्ट्रच्या भ्रमंतीसाठी येत्या १ तारखेला सुरूवात करणार आहे. ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ असा संदेश हे सायकलिस्ट या भ्रमंतीमधून देणार आहे.
नाशिकमधील रहिवासी असलेले प्रतीभा आहेर व देविदास आहेर हे दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून सायकलिंग करतात. ते नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशन या संस्थेचे सदस्य असून या अनोख्या ‘रॅम’ भ्रमंतीच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये भेटी देत तेथील शाळा-महाविद्यालयांमध्ये हजेरी लावून सायकल-पर्यावरण यांचे समीकरण समजावून सांगणार आहे. पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. त्यांच्या या सायकल भ्रमण यात्रेत अष्टविनायक, साडेतीन शिक्तपीठे, साडेतीन गणपती शिक्तपीठे, खंडेराव जेजुरी, पंढरपूर, नांदेडचा गुरु द्वारा यासह महाराष्ट्रातील वीसपेक्षाही अधिक देवस्थानांना ते भेटी देत जागृती करणार आहेत. त्यांची ही सायकल भ्रमण यात्रेच्या वाटेत राज्यातील १९ जिल्हे येणार अूसन या जिल्ह्यांमधील सुमारे पन्नासपेक्षा अधिक शाळांमध्ये आहेर दाम्पत्य हजेरी लावून भावी पिढीचे सायकलविषयी प्रबोधन करणार आहेत. त्यांनी ही भ्रमण यात्रा नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांना समर्पित केल्याचे सांगितले आहे. देविदास आहेर हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांचे वय ४६ वर्षे तर त्यांच्या पत्नी प्रतिभा या ३६ वर्षीय सायकलपटू आहे. ते मागील आठ वर्षांपासून सायकलिंग करत असून त्अष्टविनायक साायकल यात्रा, पंढरपूर सायकलवारी, नाशिक पेलेटॉन स्पर्धा, नाशिक-त्र्यंबकेश्वर सायकल फे-या करण्याचा अनुभव यांच्या पाठीशी आहे.




 

Web Title: 'RAM': Nashik's cyclist Aaher to be couple to cycling environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.