विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:20 AM2018-02-18T00:20:15+5:302018-02-18T00:24:13+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

A rally organized by the rebel student organization on Tehsildar's office | विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : अन्याय बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
तहसीलदार महेंद्र पवार मोर्चाला सामोरे गेले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी आदींच्या उपस्थितीत उद्धव रोंगटे, स्वप्नील धांडे, जालिंदर घिगे यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनावर कविता कौले, जयश्री भोये, तुळसा आचारी, सोनाली पवार, अर्चना बर्डे , फशी ढोरे, सपना भरसट, यशोधा खोडे आदी विद्यार्थिनींच्या स्वाक्षºया आहेत. यावेळी तहसीलदारांनी मी आजच वरिष्ठांना आपल्या मागण्यांबाबत कळवितो, असे अश्वासन दिले. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर चक्रे फिरली. आणि काही वेळातच सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयातून विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना येत्या २६ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.अशा आहेत मागण्यात्र्यंबकेश्वर येथील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास शासकीय इमारत मिळाली पाहिजे.
त्र्यंबकेश्वर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी.
त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल चौधरी यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी.
दि.११ नोव्हेंबर २०११ च्या शासकीय निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी.

Web Title: A rally organized by the rebel student organization on Tehsildar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक