जमीन घोटाळ्याची चौकशी यापुढेही सुरूच राहील राजाराम माने : नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:16 AM2018-03-02T02:16:36+5:302018-03-02T02:16:36+5:30

नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सुरू असणारी चौकशी यापुढेही सुरू राहणार असल्याचे नवनियुक्त महसूल आयुक्त राजाराम माने यांनी स्पष्ट केले.

Rajaram Mane: The new commissioner took charge as the chairman of the land scam | जमीन घोटाळ्याची चौकशी यापुढेही सुरूच राहील राजाराम माने : नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारला

जमीन घोटाळ्याची चौकशी यापुढेही सुरूच राहील राजाराम माने : नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारला

googlenewsNext
ठळक मुद्देयंत्रणेने स्वत:ची विश्वासार्हता वाढविण्याची गरजअचानक झालेली बदली यांचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्ट

नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सुरू असणारी चौकशी यापुढेही सुरू राहणार असल्याचे नवनियुक्त महसूल आयुक्त राजाराम माने यांनी स्पष्ट केले. जमिनींशी संबंधित उद््भवणारे वाद कमी करण्यासाठी महसूल यंत्रणेने स्वत:ची विश्वासार्हता वाढविण्याची गरज असल्याचे माने यांनी बोलून दाखविले. नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. गुरुवारी झगडे यांनी आपला पदभार नवनियुक्त विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी झगडे व माने यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. झगडे यांनी त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळा आणि अचानक झालेली बदली यांचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथील जमीन घोटाळ्यासंदर्भात आमदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर तयार करीत असताना विभागीय आयुक्त झगडे यांच्या हा गैरव्यवहार निदर्शनास आला. देवस्थानच्या जमिनीवर कूळ लावण्याची तरतूद नसते. त्र्यंबकेश्वर कोलंबिका देवस्थानची सुमारे २०० कोटींची ७४ हेक्टरहून अधिक जमीन महसूल अधिकारी, कर्मचाºयांच्या संगनमताने बळकावल्याच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरी, त्यांचे साथीदार, तत्कालीन दोन तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य देवस्थानच्या जमिनींबाबत असे प्रकार घडल्याचा संशय असून, त्याची चौकशी सुरू झाली आहे. या संदर्भात उपरोक्त चौकशी पूर्णत्वास नेऊन कायद्यानुसार कारवाई होईल, असे माने यांनी सांगितले. जमिनींच्या दस्तावेजात फेरफार होऊ नये म्हणून नियमित दप्तर तपासणी होण गरजेचे आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर असताना तीन वर्षांत जमिनींच्या १०२९ प्रकरणांचा आपण निकाल दिला. त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये अपील का केले जाते याचा अभ्यास केला. दहा जिल्ह्णांतील आकडेवारी संकलित करून यासंदर्भात आपण प्रबंध लिहिल्याचे माने यांनी सांगितले. जमिनींशी निगडीत दस्तावेजांचे योग्य जतन होणे आवश्यक आहे. त्याकरिता महसूल यंत्रणेची क्षमतावाढ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना यंत्रणेबद्दल विश्वास वाटणे गरजेचे आहे, असे माने यांनी सांगितले. वेगवेगळे प्राधीकरण असून, त्यांचा एकत्रित आराखडा तयार करण्याचा मानसही माने यांनी व्यक्त केला. झगडे यांनी प्रशासनात आणलेली गतिमानता पुढेही कायम ठेवली जाईल. त्र्यंबक रस्त्यावर सर्व शासकीय विभागांची कार्यालये एकाच ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत समाविष्ट करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात पूर्ण होईल, याकडे लक्ष देणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Rajaram Mane: The new commissioner took charge as the chairman of the land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.