राज ठाकरेंची दंगल प्रकरणी निर्दोंष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:56 PM2019-05-28T17:56:20+5:302019-05-28T18:39:18+5:30

इगतपुरी : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडुन परप्रांतिय विरोधातील सन २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप सिध्द न झाल्याने अखेर त्यांची या खटल्यातुन निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Raj Thackeray's Nirandosh Muktiya in the riots case | राज ठाकरेंची दंगल प्रकरणी निर्दोंष मुक्तता

राज ठाकरेंची दंगल प्रकरणी निर्दोंष मुक्तता

Next
ठळक मुद्देइगतपुरी न्यायालय : २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप

इगतपुरी : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडुन परप्रांतिय विरोधातील सन २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप सिध्द न झाल्याने अखेर त्यांची या खटल्यातुन निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या बाबत आधिक माहीती अशी की सन. २००८ साली रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाल्याचे माहीत झाल्यावर कार्यकर्ते आक्र मक झाले होते. या पार्श्वभुमीकर राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती.
इगतपुरीतही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटलवर मनसे सैनिकांनी हल्ला केल्याची घटना झाली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
ह्या खटल्याची न्यायाधीश के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन ह्यातील ६ आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत १८ डिंसेबर २०१८ ला राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहीले होते. राज ठाकरे या दिवशी न्यायालयात हजर झाल्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला होता.
पुढे या खटल्याची सुनावणी होऊन अखेर पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील एम. डी. तोरणे यांनी काम पाहीले. तर राज ठाकरे यांच्या वतीने इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. सुशील गायकर, अ‍ॅड. शिरोडकर यांनी काम पाहीले. या प्रकरणात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोणताही ठोस पुरावा सादर न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्त होण्यास पात्र असल्याचा आदेश न्यायमुर्ती के. आय. खान यांनी दिला.
इगतपुरी न्यायालयाच्या हजर झाले तेव्हाचे संग्रहीत छायाचित्र.
(फोटो २८ राज ठाकरे)

Web Title: Raj Thackeray's Nirandosh Muktiya in the riots case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे