राज ठाकरे यांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 03:11 PM2018-12-21T15:11:25+5:302018-12-21T15:11:41+5:30

सप्तशृंगगड :ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता जंगी स्वागत करण्यात आले.

Raj Thackeray took the view of Saptashringi Devi | राज ठाकरे यांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

राज ठाकरे यांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

Next

सप्तशृंगगड :ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी कळवण येथील मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनविसे जिल्हा उपअध्यक्ष ईश्वर कदम यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. दर्शन घेऊन खाली आल्यानतंर सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ व व्यापारी यांनीफनिक्यूलर रोपवे ट्रॉलीमुळे ग्रामस्थ व व्यापारी यांचे फार मोठे आर्थिक नूकसान होत असून त्यामुळे सर्व गावावर उपासमारीची वेळ आली आहे, त्याबद्दल कंपनीची त्वरीत चोकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळावा अशा विषयाचे निवेदन यावेळी ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नादंगावकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मूर्तडक , नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हा उपाध्यक्ष रतन कूमार ईचम, नाशिक शहर अध्यक्ष अनिल मटाले, अजय दूबे, योगेश कदम, मोटी दूबे, रवी कदम, माधवराव कदम आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: Raj Thackeray took the view of Saptashringi Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक