'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 09:43 PM2019-04-26T21:43:30+5:302019-04-26T21:53:42+5:30

राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे व्हीडिओ दाखवून या दोघांनीही आपल्याला मूर्ख बनवल्याचं म्हटलं.

Raj Thackeray expressed regret for showing 'Modi' fooled me ' in nashik rally lok sabha election | 'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप 

'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप 

Next

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नाशिकमधील सभेत सर्वप्रथम मनसेने केलेल्या 5 वर्षातील विकासकामांचा व्हिडीओ दाखवून राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि नरेंद्र मोदींवर तोफ डागली. मोदींनी काळा पैसा भारतात आणतो आणि ते पैसे तुमच्या सर्वांच्या, नियमित टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांच्या बँक खात्यात टाकतो, असे म्हटल्याचा व्हिडीओ राज यांनी दाखवला. तसेच, कसं तुम्हाला मूर्ख बनवलं, अहो मलाही मुर्ख बनवलं, असे म्हणत राज यांनी पश्चातापाची भावना नाशिकमधील सभेत व्यक्त केली. 

राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे व्हिडीओ दाखवून या दोघांनीही आपल्याला मूर्ख बनवल्याचं म्हटलं. रॉबर्ड वाड्रा यांना तुरुगात टाकतो असं भाजपावाले म्हणले होते. पण, 6 महिन्यांपूर्वी अमित शहांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पाहा, असे म्हणत अमित शहांचा एक व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये, अमित शहांनी रॉबर्ड वाड्रांना तुरुंगात टाकतो, असं आम्ही कधीही म्हटलंच नसल्याचा, व्हीडिओ राज यांनी दाखवला. मोदींना झटका आला आणि नोटीबंदी केली. मात्र, ही नोटाबंदी पूर्णत फसली. देशातील नागरिकांना कशाप्रकारे रांगेत  उभे राहावे लागले आणि त्यांना किती भयानक संघर्ष स्वताचेच पैसे मिळविण्यासाठी करावा लागला, हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. मोदी, आता केवळ जातीचे आणि पुलवामातील शहिदांचे राजकारण करत असल्याचे राज म्हणाले. मी खालच्या जातीचा असल्यामुळे मला लक्ष्य करतात अस मोदी सांगतात. मग, दलित बांधवांवर अत्याचार झाले तेव्हा मोदी काय करतात, असे म्हणत राज यांनी गुजरातच्या उना येथील दलितांवरील अत्याचाराचा व्हिडीओ दाखवला.

राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेतही पुन्हा मोदी आणि अमित शहांवर प्रहार केला. तसेच राज्यातील पाण्याच्या टंचाईवरुन फडणवीसांना लक्ष्य केले. जलसंपदामंत्री याच जिल्ह्यातले आहेत ना, मग आजही महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भिरतोय. फडणवीस एक लाख वीस हजार विहिरी बांधल्या असं  सांगतायेत, मग पाणी कुठंय, असाही प्रश्न राज यांनी विचारला. दरम्यान, राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या राज यांच्या धडाकेबाज सभांची आज सांगता झाली. आजही नाशिकमधील सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. नाशिकमधील महिलांची पाण्यासाठी होत असलेली वणवण राज यांनी आज आपल्या व्हीडिओतून दाखवली. 

राज यांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्र पोलिस दलातील शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणारे प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन मोदी, शहा यांनी समर्थन केले, ही गंभीर बाब.

लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार, याचा फैसला करणारी ही निवडणूक

नोटीबंदीमुळे देश खड्ड्यात गेला, नोटबंदी फसली. आता मोदींनी सांगावं कुठल्या चौकात ? असे म्हणत राज यांनी मोदींना लक्ष्य केले.
नरेंद्र मोदी यांनी देशात,  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भूलथापा मारल्या.
नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी येथील तळ गाठलेल्या विहिरीत महिला दोरखंडाने उतरताना व्हिडीओ दाखवून फडणवीस यांनी खोदलेल्या विहिरी गेल्या तरी कोठे.
साडे चार वर्षांपूर्वीचे 70 हजार कोटी रुपये गेले कोठे? 
भाजपा सरकार देखावा किती करणार? जनतेला लक्षात आले आहे. हे आता तुम्ही लक्षात घ्या.
भाजपा शिवसेना सरकारने राज्यात जलसंधारणची कामे कोठे अन कशी केली ? 
कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला हमीभाव मिळवून देण्याचे आश्वासन देणारे मोदी यांचे भाषण दाखविले अन फेकू चौकीदारच्या घोषणा सुरू

जातीयवादाचे विष पेरून राजकीय स्वार्थ मोदी साधत आहेत. भारतीय जवानांच्या भावनांना हात घालून मतं मागण्याचा धक्कादायक प्रकार

Web Title: Raj Thackeray expressed regret for showing 'Modi' fooled me ' in nashik rally lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.