बाजारभाव अजूनही ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:56 AM2018-06-07T01:56:12+5:302018-06-07T01:56:12+5:30

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे नाशिक बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक कमी-अधिक होत असल्याने बाजारभावात चढ-उतार होत आहे. मंगळवारी पालेभाज्या आवक घटल्याने बाजारभावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. परंतु बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतरही बाजारभाव जैसे थे राहिले. गुरुवारी बाजार समिती बंद राहण्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Quotes still 'like' | बाजारभाव अजूनही ‘जैसे थे’

बाजारभाव अजूनही ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्देबंदची अफवा : शेतकरी संभ्रमात

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे नाशिक बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक कमी-अधिक होत असल्याने बाजारभावात चढ-उतार होत आहे. मंगळवारी पालेभाज्या आवक घटल्याने बाजारभावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. परंतु बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतरही बाजारभाव जैसे थे राहिले. गुरुवारी बाजार समिती बंद राहण्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बुधवारी शेतकºयांनी बाजार समितीत मेथी, शेपू, कोथिंबीर तसेच कांदापात असा शेतमाल विक्रीसाठी आणलेला होता. मंगळवारी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झालेल्या मेथीला बुधवारी पुन्हा ४० रुपये तर कोथिंबीरला ३० रुपये जुडी बाजारभाव मिळाला. कांदापात ३० रुपये तर शेपू २३ रुपये जुडी या दराने विक्री झाली. गुरुवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेला बंद अधिक तीव्र होऊन बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार असल्याची अफवा पसरल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. तर बंदच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातील व्यापाºयांनी जास्तीचा शेतमाल खरेदी केला. आवक वाढल्याने त्यातच गुरुवारच्या दिवशी बंदच राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र मोठ्या प्रमाणात आवक होऊनही बाजारभाव जैसे थे असल्याने शेतकºयांना योग्य बाजारभाव मिळाला.

Web Title: Quotes still 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार