कुंभमेळा होणार की नाही, हाच प्रश्न

By admin | Published: July 13, 2014 11:01 PM2014-07-13T23:01:41+5:302014-07-14T00:31:05+5:30

कुंभमेळा होणार की नाही, हाच प्रश्न

This is the question of whether or not the Kumbh Mela will happen | कुंभमेळा होणार की नाही, हाच प्रश्न

कुंभमेळा होणार की नाही, हाच प्रश्न

Next

महंत ग्यानदासजी : साधुग्रामच्या जागेचा खेळखंडोबानाशिक : अलहाबाद, हरिद्वार सारख्या ठिकाणांपाठोपाठ नाशिक क्षेत्री होणारा कुंभमेळा हा शासन-प्रशासनाला अभिमानास्पद असला पाहिजे, परंतु नाशिकमधील अधिकाऱ्यांची मानसिकताच ठीक नाही. त्यामुळे अवघ्या दहा महिन्यांवर कुंभमेळा आला असताना त्याची कोणतीही कामे झालेली नाही तसेच प्रमुख महंतांना काय कामे सुरू आहेत, याचीच माहिती दिली गेलेली नाही. कुंभमेळ्याच्या प्रति असलेली एवढी अनास्था बघता कुंभमेळा भरणार की नाही, याचीच आता शाश्वती राहिलेली नाही, असे मत महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्तकेले.
अवघ्या वर्षभरावर आलेल्या कुंभमेळ्यावर प्रशासनाकडून बैठकांवर बैठका सुरू असल्या तरी ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरवायचा आहे, असे सारे साधू-महंत अनभिज्ञ आहेत. त्याचीच खंत वैष्णव पंथीयांचे ज्येष्ठ महंत ग्यानदासजी महाराज यांनी व्यक्तकेली.
नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा अन्य ठिकाणांच्या पेक्षा वेगळा असतो. शैव आणि वैष्णवांसाठी वेगळी व्यवस्था असते. १९९०-९१ मध्ये कुंभमेळा झाला होता. (पान २ वर)

Web Title: This is the question of whether or not the Kumbh Mela will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.