जिल्ह्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

By संजय डुंबले | Published: May 15, 2019 01:05 AM2019-05-15T01:05:20+5:302019-05-15T01:05:50+5:30

तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी पडली असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने गावोगावच्या पाणी योजनांनी मान टाकली आहे.

The question of fodder and water in the district is serious | जिल्ह्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथे पाण्याच्या टॅँकरची वाट बघत असलेल्या भगिनी.

Next
ठळक मुद्देधरणे कोरडीठाक, विहिरींनी गाठला तळ; पाणी योजनांनी टाकली मान

नाशिक : तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी पडली असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने गावोगावच्या पाणी योजनांनी मान टाकली आहे. पालखेड धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या मनमाड शहरात तब्बल २० ते २३ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याकडे वाहत जाताना पाहण्याची वेळ गोदाकाठ भागातील नागरिकांवर आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, चारा-पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना बाजाराची वाट दाखविली आहे.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने सुमारे ९ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला असला तरी, दुष्काळ निवारणासाठी तेथे अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून, ग्रामीण भागातील महिलांना भरउन्हात पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या आदिवासी तालुक्यांमधील चित्र तर अधिकच भयावह आहे. मनमाड शहराला २० ते २३ दिवसांनी, सधन समजल्या जाणाºया बागलाण तालुक्यातील सटाणा शहराला २० दिवसाआड, तर चांदवड शहरात १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
नांदगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, बागलाण आदी दुष्काळी तालुक्यांत जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी शेतकºयांनी पाणी आणि जनावरांच्या चाºयाबाबत तक्रारींचा पाऊस पाडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. तेव्हा अनेक सरपंचांनी दुष्काळाची दाहकता त्यांना सांगत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने चारा छावण्यांची तयारी सुरू केली असून, प्रस्ताव तयार केले जात आहेत.
जिल्ह्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा
नाशिक जिल्ह्यात एकूण ७ मोठे प्रकल्प असून, १७ मध्यम प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पात आजमितीला ९८८८ दलघफू म्हणजे अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अजून मे महिना संपायचा आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरणसमूहात २०, पालखेड धरणसमूहात ६, तर गिरणा खोरेसमूहात एकूण १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणसमूहातून मराठवाड्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जनावरांना दाखविली बाजाराची वाट
यावर्षी जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरिपाची पिके तर वाया गेलीच पण रब्बी हंगामालाही त्याचा फटका बसला. ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनी घेतलेल्या पिकांनाही भाव मिळाला नाही. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले. अशा स्थितीत जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांनी जनावरांना बाजाराची वाट दाखविली. काही तालुक्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीटंचाईमुळे तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे.

Web Title: The question of fodder and water in the district is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.