शैक्षणिक वार्षिक आराखड्याचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:36 AM2019-07-19T00:36:31+5:302019-07-19T00:39:10+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या शिक्षक वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन सांगळे यांनी यावेळी केले.

Publication of academic yearly layout | शैक्षणिक वार्षिक आराखड्याचे प्रकाशन

आराखडा प्रकाशनप्रसंगी यतिन पगार, शीतल सांगळे, एस. भुवनेश्वरी आदी.

Next
ठळक मुद्देशिक्षकांनी वर्षभरात करावयाच्या शैक्षणिक उपक्रमाचा यात समावेश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या शिक्षक वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन सांगळे यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेच्या थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी उपस्थित होते. शिक्षकांनी वर्षभरात करावयाच्या शैक्षणिक उपक्रमाचा यात समावेश असून, त्यात दप्तरमुक्त शनिवार, शिक्षणाचा कट्टा, मध्यान्ह भोजन योजना यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येणार असून, यासाठी ही पुस्तिका उपयोगी ठरणार आहे. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले. चालू शैक्षणिक वर्षापासून आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
Web Title: Publication of academic yearly layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.