पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 06:26 PM2019-01-11T18:26:06+5:302019-01-11T18:26:58+5:30

रेझींग डे निमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाणे व एसएनडी पॉलीटेक्न्किच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

Public awareness about road safety through street lights | पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

Next
ठळक मुद्देरेझींग डे : पॉलिटेकनिकच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन

रेझींग डे निमित्त पथनाट्याद्वारे सायबर व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करतांना एसएनडी पॉलिटेकनिकचे विद्यार्थी.
येवला : रेझींग डे निमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाणे व एसएनडी पॉलीटेक्न्किच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. प्रबोधन व जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून येथील बसस्थानकावर सायबर व रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना पटवून दिले.
या पथनाट्यामध्ये संगणक विभागाच्या मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी प्रामुख्याने सोशल मीडियावर फेक अकाउंटसारख्या साधनांची वापर करून फसवणूक होते. त्यावेळेस पोलीस विभागाची मदत घेऊ शकतो आणि त्यानंतर पदनाट्य मधून एफआयआर अ‍ॅपच्या मदतीने मुली किंवा अडचणीतील व्यक्ती कशी मदत घेऊ शकतो याबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक रस्त्यावरून प्रवाशी वाहतुक करणारे वाहने धावत असतात. वाहने चालविताना वाहन परवाना, चालकांने वाहन चालवण्याचा परवान यासह सर्व कागदपत्रे परिपूर्ण स्वत: जवळ बाळगा व कटु प्रसंगास सामोरे जाताना त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी. मोटरसायकस्वार, बैलगाडी धारक सर्वांनीच नियमाचे पालन केल्यास कारवाईची वेळ येणार नाही. वाहन चालवताना बेशिस्त वर्तन केल्यास कारवाई अटळ राहील असा संदेश देखील या विद्यार्थ्यांनी दिला.
बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनेकांनी या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी रस्ता सुरक्षा बाबत विविध नियम समजून सांगितले.
कार्यक्र माचे संयोजन प्रा. भालेराव, प्रा.पी.एम.लहरे, बी.बी.गव्हाणे, एकनाथ इंगळे यांनी केले.

Web Title: Public awareness about road safety through street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.