स्वयंरोजगारासाठी समांतर शिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:00 AM2019-06-26T00:00:26+5:302019-06-26T00:25:37+5:30

विद्यार्थ्यांना रोजगार उद्योजक व स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी समांतर प्रक्रियेतून दर्जेदार शिक्षणातून ज्ञानदानाचे कार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.

 Provide parallel education for self-employed | स्वयंरोजगारासाठी समांतर शिक्षण द्यावे

स्वयंरोजगारासाठी समांतर शिक्षण द्यावे

Next

नाशिकरोड : विद्यार्थ्यांना रोजगार उद्योजक व स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी समांतर प्रक्रियेतून दर्जेदार शिक्षणातून ज्ञानदानाचे कार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीस १०१ वर्षपूर्तीनिमित्त नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयास ५६ वर्षापूर्तीबद्दल आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोसावी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनेश कलाल, आरोग्यधामच्या संचालिका डॉ. विद्या देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य धनेश कलाल यांनी महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा सादर केला. पाहुण्यांच्या हस्ते ‘उन्मेष’ तसेच एचपीटी महाविद्यालयाचे ‘स्वयंप्रकाश’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजया धनेश्वर व आभार प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, एस. आर. खंडेलवाल, संध्या खेडकर, डॉ. प्रमोद कुमार हिरे, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. महेश औटी, आर. आर. क्षीरसागर, पर्यवेक्षिका अंजली कुलकर्णी तसेच नाशिकरोड केंद्रातील उपप्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. विद्या देशपांडे यांनी आरोग्याची गुरूकिल्ली या विषयावर व्याख्यान देत विविध आसने व त्यांचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक सादर करून दाखविली. यानंतर सेवानिवृत्त प्रा. एस. के. वांजळे, जयरामभाई हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक आर. आर. चौधरी, सहशिक्षिका माया कुलकर्णी व पीएचडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Provide parallel education for self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.