आधारच्या नोंदणीत राज्यातच अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:42 PM2018-01-19T18:42:38+5:302018-01-19T18:44:55+5:30

गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते.

Problems in the state of registration of Aadhaar | आधारच्या नोंदणीत राज्यातच अडचणी

आधारच्या नोंदणीत राज्यातच अडचणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहाआॅनलाईनची तक्रार : प्रधान सचिवांना पत्र युआयडीचा सर्व्हर बंद असल्यामुळे पुर्णपणे काम थांबले

नाशिक : केंद्र व राज्य सरकार एकीकडे सर्वच शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी नागरिकांना आधार अनिवार्य करीत असतांना दुसरीकडे शासनाकडूनच आधारचे अपडेशन करण्यासाठी येणाºया तांत्रिक अडचणी दूर करण्यात दुर्लक्ष केले जात आहे. युआयडीने सदरच्या कामासाठी महाआॅनलाईनची नेमणूक केली असली तरी, युआयडीचे सर्व्हर धिम्या गतीने काम करीत असल्याने गेल्या काही दिवसांपासून आधारचे कामकाज थांबल्याची तक्रार महाआॅनलाईनने राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या पत्रात महाआॅनलाईनने म्हटले आहे की, गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते. त्यानंतर युआयडीकडून आधार नोंदणी होऊन नागरिकांना आधार क्रमांक दिला जातो. पॉकेट अपलोड करायचे काम ११ जानेवारी पासून युआयडीचा एसएफटीपी सर्व्हर बंद असल्यामुळे पुर्णपणे थांबले आहे. दि. १६ जानेवारी पर्यंत हे काम पुर्णपणे बंद होते १७ जानेवारीपासून हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू झाले आहे. यासाठी युआयडीने सुचविलेल्या उपाययोजना अतिशय किचकट असल्यामुळे हे काम सुरू होण्यास वेळ लागत आहे. याच बरोबर पोर्टल युआयडी गर्व्हमेंट हे अतिशय महत्वाचे पोर्टल जे नवीन आधार नोंदणी करण्याचे काम करते ते गेल्या दोन आठवड्यापासून पुर्णपणे बंद आहे व या संदर्भात युआयडीए कडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत युआयडीएने मान्य केलेले ७६६ आॅपरेटर सक्रीय करण्याचे काम अजुनही युआयडीएकडे प्रलंबीत आहे व ही प्रलंबीत आॅपरेटरची संख्या आता ८१६ इतकी आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे शासन मान्यताप्राप्त आधार केंद्र आहेत परंतु युआयडीए मात्र ते मान्य करण्यास तयार नसल्याचेही महाआॅनलाईनने तक्रारीत म्हटले आहे. युआयडीएकडून कोणतीही कारणमिमांसा न करता अजुनही आॅपरेटर ब्लॅकलिस्ट करण्याचे काम सुरू असून, या सर्व कारणांमुळे आधार नोंदणीचे काम अतिशय संथ गतीने किंवा बंद झाले आहे.

Web Title: Problems in the state of registration of Aadhaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.