महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:56 PM2018-02-09T14:56:14+5:302018-02-09T15:01:15+5:30

जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे.

'Prizes' to police working on private inspector general | महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’

महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’

Next
ठळक मुद्देआजारी मुलीची सुश्रृषा : ग्रामीण पोलिसांचा अफलातून शोध कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिका-यांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत

नाशिक : शासकीय अधिका-यांनी हाताखालच्या कर्मचा-यांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो, विशेष करून पोलीस खात्यात तर पोलीस कर्मचा-यांना अधिका-यांच्या बायका-मुलांचेही खासगी कामे करावी लागल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना त्यात नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांची भर पडली आहे. विनयकुमार चौबे यांची मुलगी आजाराने रूग्णालयात दाखल असताना चौघा पोलिसांनी तिला बरे करण्यात अथक परिश्रम घेतल्याबद्दल महानिरीक्षकांनी पोलीस खात्याच्या निधीतून त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केल्याची बाब राज्यभर चर्चेत आली आहे.
जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. अर्थात सदरचा प्रकार पोलीस खात्यातच होतो असे नाही तर अन्य शासकीय खात्यांमध्येही असाच प्रकार सुरू असून, कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिका-यांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. नाशिकच्या एका माजी विभागीय आयुक्तांच्या घरी स्वयंपाकाचे काम करणा-या कोतवाल व महसुल खात्याच्या महिला शिपायांचा आयुक्तांच्या पत्नीकडून होणा-या छळाची उदाहरणे आजही दिली जात आहेत. अशा परिस्थितीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची कन्या जानेवारी महिन्यात आजारी पडल्याने तिला उपचारार्थ  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन,तीन दिवसांच्या उपचारानंतर कन्या बरी झाल्याने तिला घरी सोडण्यात आले. परंतु या काळात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय निंबा खराटे, आसिफ उमर शेख, पोलीस शिपाई मारूती सटवा पांडलवाड, किरण देवराम नागरे या चौघा कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतल्याचे चौबे यांचे म्हणणे आहे. या चौघा कर्मचा-यांची बक्षिशीची घोषणा करणा-या पोलीस नोटीसमध्ये ‘दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये श्रमदान करीत विशेष मेहनत घेवून जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली’ असे गौरवोद्गार काढण्यात आले असून, त्यापोटी त्यांना प्रत्येकी शंभर रूपये रिवार्ड देण्याची शिफारस करण्यात आली व त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मुळात चौबे यांच्या कन्येवर दिवसरात्र हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांनी उपचार केलेले असताना चौघा कर्मचा-यांनी दिवसरात्र नेमकी काय मेहनत घेतली हे कळू शकलेले नाही.

Web Title: 'Prizes' to police working on private inspector general

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.