Priyanka Gandhi's entry will not get support to congress; BJP vice president's claim | प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा
प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा

नाशिक : प्रियंका गांधी वाड्रा यांच्या येण्याने उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला जनाधार मिळणार नाही. मोदींना रोखण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी एकत्र झालेल्या पक्षांना जनता नाकारेल. महाराष्ट्रात सेनेसोबत युती हा निर्णय पार्लमेंटरी समिती घेणार असून लवकरच युतीबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिली. 

 वसंत स्मृती कार्यालयात जाजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा लवकरच 'भारत के मन की बात, मोदी के साथ', हे अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 12 फेब्रुवारीपासून 'मेरा परिवार, भाजप परिवार' या अभियानाची देशात सुरुवात होणार असून अमित शहा गुजरातमध्ये हे अभियान सुरु करणार आहे, 

पत्र संवाद पेटीतील सर्व पत्रांची दखल घेतली जाणार असून याकरीता विशेष समिती बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


Web Title: Priyanka Gandhi's entry will not get support to congress; BJP vice president's claim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.