तिसऱ्या श्रावणी फेरीला यंदाही खासगी वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:17 AM2018-08-10T01:17:25+5:302018-08-10T01:22:43+5:30

नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावणमासात दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यंदाही राज्य परिवहन महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर फक्त एस. टी. बसनेच भाविकांची वाहतूक करण्याचे ठरविले असून, विशेष करून तिसºया सोमवारी होणाºया ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दिवशी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांना बंदी करण्याचे साकडे एस.टी. महामंडळाने जिल्हाधिकाºयांना घातले आहे.

Private vehicle ban on third Shrapranari Pariya this year | तिसऱ्या श्रावणी फेरीला यंदाही खासगी वाहनांना बंदी

तिसऱ्या श्रावणी फेरीला यंदाही खासगी वाहनांना बंदी

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : जव्हारफाटा, खंबाळे फाट्यावर वाहनतळ, वाहतूक कोंडीवर उपाय

नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावणमासात दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यंदाही राज्य परिवहन महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर फक्त एस. टी. बसनेच भाविकांची वाहतूक करण्याचे ठरविले असून, विशेष करून तिसºया सोमवारी होणाºया ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दिवशी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांना बंदी करण्याचे साकडे एस.टी. महामंडळाने जिल्हाधिकाºयांना घातले आहे.
बारा ज्योतिलर््िंागापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी श्रावण मासात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. बाहेरगावचे प्रवासी बहुतांशी खासगी वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे येत असले तरी, परराज्यांतील भाविकांसाठी एस. टी. रेल्वेचा मार्ग सुकर असल्याने त्यांना नाशिकमार्गेच त्र्यंबक गाठावे लागते. विशेष करून सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला एकाच दिवशी लाखो भाविकांची हजेरी लागत असल्याने अशा वेळी प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्याचे मोठे आव्हान एस.टी. महामंडळासमोर उभे ठाकते.
अशा वेळी वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने दि. २६ व २७ या दोन दिवसांसाठी खंबाळे फाटा ते त्र्यंबकेश्वर यादरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे.
त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांनी येणाºया भाविकांची वाहने खंबाळे फाटा, जव्हारफाटा येथेच उभी करण्यात यावेत व त्र्यंबक बसस्थानकाच्या चारही बाजूस दोनशे मीटरपर्यंत नो पार्किंग झोन जाहीर करण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना केली आहे. यंदाही एस. टी. महामंडळाने श्राावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची वाहतूक करण्यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असून, त्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. येत्या रविवारपासून श्रावण मासाला सुरुवात होत असून, दुसºयाच दिवशी श्रावणाचा पहिलाच सोमवार आहे. या काळात भाविकांची वाहतूक केली जाईल, परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिसºया श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी डोंगराला प्रदक्षिणा मारण्याची भाविकांची श्रद्धा आहे. यादिवशी सुमारे दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे आदल्या दिवशीच दाखल होत असल्यामुळे प्रदर्शना पूर्ण झाल्यानंतर नाशिकला परतीसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.

Web Title: Private vehicle ban on third Shrapranari Pariya this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.